घरमहाराष्ट्रनाशिकमराठी शाळांच्या उदासीनतेला मराठीजनच जबाबदार, चपळगावकरांचे मत

मराठी शाळांच्या उदासीनतेला मराठीजनच जबाबदार, चपळगावकरांचे मत

Subscribe

मराठी भाषेवर मराठीजनांनी नामुष्की आणल्याचे परखड मत चपळगावकरांनी मांडले

नाशिक : मराठीच्या दुरवस्थेला मराठीजनच जबाबदार असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यीक आणि न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी स्पष्ट केले. मराठी भाषेबाबत मूलगामी स्वरुपात काम होत नाही, तोपर्यंत मराठीची स्थिती बिकटच असल्याचे चपळगावकर म्हणाले. या शिवाय शालेय स्तरावरील मराठीच्या धोरणाबाबत सजगतेने काम करण्याची गरज त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. मराठी शाळांमधून सेमी मराठी किंवा सेमी इंग्रजी विभाग सुरू करणे ही मराठी भाषेवर मराठीजनांनी आणलेली नामुष्की असल्याचे परखड मत चपळगावकर यांनी मांडले.
नाशिकमध्ये आल्यावर मला तीन गोष्टींची प्रकर्षाने आठवण होते, कवी गोविंद यांची कविता बाबाराव सावरकर यांनी प्रसिद्ध केली त्यामुळे बाबाराव सावरकर यांना शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कवी कुसुमाग्रज यांची आठवण नाशिकमध्ये आल्यावर होते, असे न्यायमूर्ती चपळगावकर म्हणाले. आपल्या राज्यघटनेने विचार करण्याचा आणि विचारांचा विकास करण्यासाठी अधिकार दिला आहे. शिक्षणात मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. बालवयापासूनच मराठी भाषा शिकविली गेली तर त्यात विशेष प्राविण्य मिळवता येणे शक्य आहे. आपण स्वतःच्या भाषेचा अधिक वापर केला पाहिजे. मराठी ही ज्ञान भाषा करावी यासाठी यशवंतराव चव्हाण यांचे प्रयत्न त्या काळापासून होते. ही भाषा ज्ञान भाषा आपल्याला करायची असेल तर तिचा वापर वाढला पाहिजे. मराठी भाषा अधिक वाढविण्यासाठी शाळेत शिकणार्‍या मुलांच्या पालकांची देखील तितकीच महत्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -