घरमहाराष्ट्रनाशिकसंमेलन गीतातून स्वातंत्र्यवीरांना डावलले, मनसेचा आरोप

संमेलन गीतातून स्वातंत्र्यवीरांना डावलले, मनसेचा आरोप

Subscribe

मनसेने केला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजकांचा निषेध

मराठी साहित्यात आपल्या प्रतिभेच्या तेजाने तळपणार्‍या स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकरांचा नाशिक येथे होणार्‍या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये स्पष्ट उल्लेख नसल्याने सावरकरप्रेमींमध्ये नाराजी आहे . या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने साहित्य संमेलन आयोजकांचा निषेध व्यक्त केला आहे.

नाशिकमध्ये होणार्‍या साहित्य समंलेनाची जोरदार तयारी सुरू आहे.पालकमंत्री छगन भुजबळ याच्या हस्ते सोमवारी संमेलन गीताचे अनावरण करण्यात आले. या गीतातून स्वातंत्र्यवीर यांचा उल्लेख डावलल्याने मनसे कार्यालयात सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी केली.याबाबत स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांना भेटून संमेलन नगरीला स्वातंत्रयवीर सावरकरांच नाव देण्याची मागणी करणार असल्याचे मनसेतर्फे सांगण्यात आले. नाशिकचा सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाचा इतिहास आणि आढावा या गीतातून घेतला आहे. या गीतामध्ये स्वातंत्र्यवीर,नाशिकचे भूमिपुत्र, साहित्यिक आणि मुंबई येथे १९३८मध्ये झालेल्या २३ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वि.दा. सावरकर यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख नाही.

- Advertisement -

सावरकर यांचा जन्म२८ मे १८८३रोजी भगूर, नाशिक येथे झाला.त्यांनी जवळपास पन्नासच्यावर पुस्तके लिहिली.असे असूनही सावरकरांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख साहित्य संमेलन गीतात नाही.त्यामुळे आयोजकांनी नाशिककरांचा अपमानच केला आहे. आयोजकांनी ही चूक त्वरित सुधारावी तसेच साहित्य संमेलनाच्या नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देऊन स्वातंत्र्यवीरांचा यथोचित सन्मान करावा अशी आग्रही मागणी मनसेने केली आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, सचिव व प्रवक्ते पराग शिंत्रे, उपजिल्हाध्यक्ष मनोजघोडके, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे , भाऊसाहेब निमसे, राकेश परदेशी, धीरज भोसले, संदीप भवर, विजय आगळे, चिन्मय देशपांडे,प्रफुल्ल बनबैरू,वैभव राऊंदळ,शहेबाज काजी, किरण शिंदे, योगेश पाटील व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी उपस्थित होते

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -