घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त विधानप्रकरणी नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल

मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त विधानप्रकरणी नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आज सहावा दिवस आहे. या यात्रे दरम्यान नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. आहेत. यात्रेच्या सुरुवातीपासून मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नारायण राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडेतोड टिका केली. पण यादरम्यान रायगडमधील महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असताना नारायण राणे यांची जीभ घसरली आणि यामुळेच आता नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांना कानशिलात लावण्याच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी नारायण राणे यांच्याविरोधात नाशिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार नारायण राणे यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. पण यामुळे आता राजकारण चांगलंच तापणार असून राणे विरुद्ध शिवसेना गटात आणखीन कटूता वाढणार आहे.

काल, सोमवारी रायगडमधील महाड पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री यांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले होते की, ‘ज्यांना स्वातंत्र्यदिनाबद्दल माहित नाही त्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती.’ याच वादग्रस्त विधानाप्रकरणी नाशिक शहराचे शिवसेनेचे शहर अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणे यांच्यावर नाशिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल बदनामीकारक, द्वेषभाव निर्माण करणारी विधाने करून समाजामध्ये शत्रुत्वाची व द्वेषाची भावना निर्माण होईल, असे विधान केले असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. या तक्रारीनुसार नारायण राणे यांच्यावर भादवि कलम ५००, ५००(२), १५३-ब (१)(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

नाशिकचे शिवसेनेचे शहर अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी केलेली तक्रार…

- Advertisement -

हेही वाचा – पुन्हा रायगडमध्ये येण्यासाठी निधी चौधरींचे प्रयत्न


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -