घरमहाराष्ट्रनाशिकउन्हाच्या चटक्याने नाशिककर भाजले

उन्हाच्या चटक्याने नाशिककर भाजले

Subscribe

नाशिक : राज्यात उष्णतेची लाट आली असून, बुधवारी नाशिक, मालेगावचे तापमान चाळीशीपार गेल्याने नागरिकांना कडकडीत उन्हाचा सामना करावा लागत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने वाढणारे कमाल तापमान गुरुवारी थेट ४१.१ अंशापर्यंत पोहचल्याने नाशिककर उन्हाच्या चटक्याने भाजून निघाले. हंगामातील हे सर्वाधिक उच्चांकी तामान असल्याची नोंद हवामान विभागाकडे केली आहे.

सकाळपासून असह्य उन्हाच्या झळांनी नाशिककर हैराण झाले आहेत. उन्हाच्या चटक्याने दुपारी घराबाहेर पडणेही मुश्किल होत आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास शहरातील प्रमुख रस्त्यांवर लॉकडाऊन सदृश्यस्थिती दिसून येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ३० एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील. विदर्भात मात्र यानंतरही उकाड्याची लाट कायम राहणार आहे. या काळात कमाल तापमान सरासरीपेक्षा १ ते ३ अंशांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. मात्र, विदर्भामध्ये सर्वात जास्त उन्हाची तीव्रता राहणार असल्याचे सांगितले आहे. आगामी आठवड्यात राज्यातील उन्हाची तीव्रता अधिक राहणार असून कमाल तापमानाचा पारा चढता राहणार आहे. काही भागांत पावसाची शक्यता तर, पुढील ४८ तासात दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात व संलग्न भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, तर पुढील पाच दिवस विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -