घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिककरांनो पाणी जपून वापरा, दर शनिवारी राहणार पाणीपुरवठा बंद

नाशिककरांनो पाणी जपून वापरा, दर शनिवारी राहणार पाणीपुरवठा बंद

Subscribe

नाशिक : जून महिन्यात दक्षिण प्रशांत महासागरात अल निनो वादळ आले तर पाउस लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक महापालिकेने आठवडयातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून आता आठवडयातून शनिवारी शहराचा पाणी पूरवठा बंद राहणार आहे.

खरंतर धरणांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. त्यात महत्वाची बाब म्हणजे मुंबईसह मराठ वाड्यात देखील नाशिकमधील धरणातून पाणी दिले जाते. त्यामुळे नाशिकला मुबलक पाणीसाठा असतो. त्यामुळे शक्यतोवर नाशिककरांवर पाणीबाणीची वेळ येत नाही. मात्र, यंदाच्या वर्षी पाणीकपातीचा निर्णय नाशिक महानगर पालिकेने घेतला आहे. काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार यंदाचा वर्षाचा मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे प्रशांत महासागरामधील अल निनो या वादळचा परिणाम होणार आहे. त्यामुळे पाऊस उशिराने दाखल होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. याच संपूर्ण पार्श्वभूमीवर नाशिक महानगर पालिकेकडून केला जाणारा पाणीपुरवठा आठवड्यातील एक दिवस बंद केला जाणार आहे.

- Advertisement -

जुलै पर्यन्त जरी पाऊस पडला नाहीतरी नाशिककरांना पाणी पुरेल इतका पाणीसाठा आहे. मात्र, पावसाळा लांबणीवर गेल्यास परिस्थिती बदलू शकते. नाशिक महानगर पालिकेत आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थित पाण्याच्या संदर्भात बैठक झाली होती. त्यामध्ये सर्व बाजूने माहिती घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कदाचित पाऊस जून महिण्यात पडला नाहीतर त्यावेळी पाणीकपात करण्यापेक्षा आधीच दोन महीने पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. सध्याची परिस्थिती आणि उपलब्ध महितीनुसार दर महिन्याला पाणी कपातीचा एकद दिवस वाढविला जाणार आहे. त्यामध्ये एप्रिलमध्ये आठवड्यातील एक दिवस पाणी कपात, त्यानंतर मे महिण्यात दोन दिवस पाणी कपात आणि जून महिन्यात तीन दिवस पाणी कपात केली जाईल असे सध्याचे नियोजन आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट असणार आहे. जो पर्यंत मुसळधार पाऊस सुरू होत नाही. धरणसाठयात पाण्याची पातळी जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत ही अंमलबजावणी केली जाणार आहे. याबाबत नाशिक महानगर पालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून राज्य शासनाला प्रस्ताव देण्यात आला आहे.

इतकी होईल बचत 

सध्याची परिस्थिती पाहता गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात पाच टक्के कमी जलसाठा आहे. नाशिक शहराला गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. गंगापूर धरण समुहात गतवर्षी ५९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा ५७ टक्के म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत २ टक्के कमीच आहे. आठवडयातून एकदा पाणी कपात केल्यास महिन्यात चार दिवसांचे २४०० दशलक्ष पाणी बचत होईल. पुन्हा पाच दिवस पाणी कपात केली तर ३ हजार दशलक्ष पाणी बचत होईल. तीन महिन्याचा विचार केल्यास १५ हजार दशलक्ष लिटर पाण्याची बचत होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -