Friday, July 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक त्र्यंबक, सिन्नरपर्यंत धावणार महापालिकेची बस

त्र्यंबक, सिन्नरपर्यंत धावणार महापालिकेची बस

२० जुलैच्या बैठकीत होईल निर्णय; १ ऑगस्टपासून मार्गांमध्ये वाढ

Related Story

- Advertisement -

नाशिक महापालिकेतर्फे सुरु केलेल्या शहर बससेवेला गेल्या चांगला प्रतिसाद मिळत असून दोन आठवड्यांच्या काळात ४० हजारांहून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. त्यामुळे या सेवेचा दुसरा टप्पा सुरु होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. हा या पार्श्वभूमीवर महापालिका परिवहन महामंडळाची बैठक येत्या २० जुलैला होणार आहे. त्यात बसेसच्या संख्येत वाढ करुन मार्गही वाढविण्यासंदर्भात निर्णय होतील. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद बघता १ ऑगस्टपासून नाशिक ते त्र्यंबकेश्वर आणि नाशिक ते सिन्नर बस सुरु होण्याची दाट शक्यता आहे.

शहरात महापालिकेतर्फे ८ जुलैपासून बससेवा सुरु करण्यात आली असून, पहिल्या दिवशी एक हजारहून अधिक प्रवाशांनी बससेवेचा लाभ घेतला. लोकार्पण सोहळा झाल्यानंतर आजपर्यंत ४० हजारांहून अधिक नागरिकांनी महापालिकेच्या बससेवेचा लाभ घेतला आहे. त्यातून आठ लाखांचा व्यवसाय मिळाला आहे. दिवाळीपर्यंत सिटी लिंक कंपनीने २५० बसेस रस्त्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक महिन्याला बैठक होणार असून त्यात सेवेचा आढावा घेतला जाणार आहे. सध्या २७ बसेसच्या फेर्‍या सुरु आहेत. येत्या काही दिवसात अजून २५ बसेस रस्त्यावर धावतील. त्यामुळे बसेसची संख्या ५३ होईल. त्यासाठी सिटी लिंकने अजून चार मार्गावर बस फेर्‍या सुरु करण्याचे नियोजन केले आहे. नाशिक महापालिकेची शहर बस वाहतूक सेवा ३० किलोमीटरच्या परिघातच चालविता येते. तसा कायदाच असल्याने त्यापुढे सिटी बसेस नेता येत नसल्याने सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच या ३० किलोमीटरपर्यंत जे तालुक्याचे शहर वा मोठी गावे येतात तिथपर्यंत बस नेली जाणार आहे.

- Advertisement -

या अंतराच्या आत त्र्यंबकेश्वर आणि सिन्नर शहरांचा समावेश होतो. त्यामुळे येत्या १ ऑगस्टपासून सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत दर १५ मिनिटांच्या अंतराने नाशिक ते त्र्यंबकेश्वर आणि नाशिक ते सिन्नर बस सुरु होण्याची दाट शक्यता आहे. मात्र तत्पूर्वी या नियोजनास महामंडळाच्या बैठकीस मान्यता घेतली जाईल. सिटी लिंकने त्र्यंबकेश्वर नाशिक सेवा देताना त्र्यंबक शहर ते थेट नाशिक तपोवन अशी ४५ रुपये भाडे आकारणी केली आहे.

सप्टेंबरमध्ये दिंडोरी, पिंपळगाव बसही सुरु होणार

नाशिक त्र्यंबकेश्वर आणि नाशिक सिन्नर या मार्गावर बसेस सुरु झाल्यानंतर दुसर्‍या टप्प्यात नाशिक ते दिंडोरी आणि नाशिक ते पिंपळगाव बसवंत सेवाही देण्याचा प्रस्ताव आहे. साधारणत: सप्टेबर महिन्यात ही सेवा सुरु होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -