घरमहाराष्ट्रनाशिकपोस्ट कोविड रुग्णांसाठी पालिकेने सुरू केले ओपीडी

पोस्ट कोविड रुग्णांसाठी पालिकेने सुरू केले ओपीडी

Subscribe

या सेवेचा लाभ घेण्यासाठी आयुक्तांनी नाशिककरांना केले आवाहन

कोरोना संसर्गातून बर्‍या झालेल्या अनेक रुग्णांमध्ये प्रचंड थकवा, खोकला किंवा म्युकरमायकोसिससारखे आजार दिसून येतात. अशा रुग्णांना योग्य मार्गदर्शन आणि वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेने आपल्या सर्व रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुक्त रुग्णांमध्ये डिस्चार्जनंतर तीन महिन्यांनंतर अन्य आजाराची लक्षणं दिसतात. अशा रुग्णांसाठी महापालिकेने बाह्यरुग्ण विभाग सुरू करून डॉक्टरांची नियुक्ती केलीय. कोरोना उपचारानंतर काही त्रास जाणवल्यास रुग्णांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केलंय. पंचवटी, नाशिकरोड, सिडको, सातपूर, नाशिक पूर्व आणि पश्चिम या सर्व सहा विभागांतील पालिका रुग्णालयांत ही सेवा उपलब्ध राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -