घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशकात उच्चांकी तापमान @ ४०.७

नाशकात उच्चांकी तापमान @ ४०.७

Subscribe

वाढत्या तापमनामुळे नाशिककर हैराण झाले असून, या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी तापमानाची नोंद मंगळवारी (दि.१६) सायंकाळी करण्यात आली. कमाल तापमानाचा पारा थेट ४०.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचल्याचे पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राकडून सांगण्यात आले.

नाशिक शहराचे वातावरण काही दिवसांपासून तापण्यास सुरूवात झाली आहे. मार्चच्या अखेरच्या आठवड्यात ३९.४ अंशापर्यंत कमाल तापमान पोहचल्याची नोंद झाली होती. मागील २० दिवसांपासून सरकला नव्हता. एप्रिल महिना उजाडल्यानंतर कमाल तापमानाचा पारा ३७ ते ३८ अंशाच्या जवळपास स्थिरावत होता. मात्र, अचानकपणे रविवारी सायंकाळनंतर वातावरणात बदल झाला. दमटपणा वाढल्यामुळे रविवारी रात्री नाशिककरांनी कमालीचा उकाडा अनुभवला. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता किमान तापमान २४.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचल्याची नोंद झाली. तसेच कमाल तापमानानेही चाळीशी ओलांडली. उन्हाचा चटका अन् वाढत्या उकाड्यामुळे नागरिक मंगळवारी घामाघूम झाले. एका दिवसात किमान तापमान वाढीमुळे नाशिककरांना उकाड्याचाही सामना करावा लागला. पुढील आठवड्यातही तापमान वाढणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -