घरमहाराष्ट्रनाशिकइगतपुरीतल्या जिल्ह्या परिषद शाळेला महिंद्रा कंपनीकडून प्रोजेक्टर भेट

इगतपुरीतल्या जिल्ह्या परिषद शाळेला महिंद्रा कंपनीकडून प्रोजेक्टर भेट

Subscribe

नांदगाव बुद्रुक: सरपंच देवा मोरे, माजी सरपंच गणपत जाधव यांच्या पाठपुराव्याने सुविधा

इगतपुरी : तालुक्यातील नांदगाव बुद्रूक जिल्हा परिषद शाळेला अत्याधुनिक इंटरॅक्टिव्ह पॅनल प्रोजेक्टरची भेट देण्यात आली. या यंत्रणेमुळे विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे शिक्षण मिळणार आहे. लोकनियुक्त सरपंच देवा मोरे आणि गोंदे दुमालाचे माजी सरपंच गणपत जाधव यांच्या विशेष पाठपुराव्यातुन गोंदे औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा कंपनीच्या सहकार्याने प्रोजेक्टर देण्यात आल्याने विद्यार्थी-पालकांनी आनंद व्यक्त केला. महिंद्रा कंपनीचे अधिकारी सुनील तिडके, संतोष दुसाने, संतोष जाधव यांनी या शाळेला प्रोजेक्टरची मदत केल्याने विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले.

उपसरपंच मनीषा गायकर, ग्रामपंचायत सदस्य राजाराम गायकर, अशोक गायकर, दत्तू पावडे, मंगला कोकाटे, अरुण शिरसाठ, लता शिरसाठ यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत या प्रोजेक्टरचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाप्रसंगी गणपत जाधव म्हणाले की, शिक्षणाने पुढील पिढी अत्यंत चांगल्या पद्धतीने घडू शकते. त्यासाठीच सरपंच देवा मोरे यांच्यासह आम्ही शाळेला महत्वपूर्ण साहित्य दिले आहे. लोककल्याणासाठी आगामी काळात आम्ही नेहमीच लोकांच्या सोबत राहून कार्य करू, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

- Advertisement -

गोंदे सोसायटीचे माजी चेअरमन विजय नाठे, माजी सरपंच परशराम नाठे यांनीही शाळेचे आणि ग्रामस्थांचे यावेळी कौतुक केले. कार्यक्रमाप्रसंगी ग्रामस्थ हिरामण गायकर, माजी सरपंच भाऊसाहेब गायकर, विलास मुसळे, दिनकर गायकर, सुभाष गायकर, नामदेव कोकाटे, ज्ञानेश्वर गायकर, नाना गायकर, तानाजी गायकर, योगेश पाळदे, उत्तम पाळदे, निखिल पागेरे, विलास पागेरे, उत्तम गायकर, माजी सरपंच तुकाराम गायकर, ज्ञानेश्वर गायकर, दादा शिरसाठ, दत्तू गायकर, बन्सी जाधव, विष्णू पागेरे, विठोबा संधान, एकनाथ मुसळे, बळीराम शिरसाठ, निखिल पागेरे, अनिता गायकर, बळीराम शिरसाठ, सरला जाधव, संगीता नाडेकर, कविता मुसळे, भरत गायकर, रोहिदास गायकर, कमल पागेरे, छाया पागेरे आदी उपस्थित होते.

शाळा व्यवस्थापन समितीच्या मनीषा गायकर, नितीन पगार, विकास मुसळे व निखिल गायकर यांनी सरपंच देवा मोरे आणि माजी सरपंच गणपत जाधव यांच्यासह महिंद्रा कंपनीचे आभार मानले. शिक्षक बालशिंग परदेशी, नितीन पवार, सागर जळगावकर, राजू सोळंकी, छायावती देवरे, अशोक मोरे, उमेश बैरागी, भारती माठे, राजेंद्र पवार यांनी उपस्थितांचे आभार मानत यापुढेही सहकार्याचे आवाहन केले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -