घरक्राइमसंगमनेर तालुक्यात हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा

संगमनेर तालुक्यात हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा

Subscribe

पीडित मुलींची सुटका; एक महिला ताब्यात

संगमनेर : पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या विशेष पथकाने संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर शिवारात कारवाई करत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफास केला. ही कारवाई बुधवारी (दि. ७) करण्यात आली. या घटनेने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना घारगाव परिसरातील चंदनापुरी घाटातील पोखरी बाळेश्वर शिवारात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. त्यावरून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटातील पोखरी बाळेश्वर शिवारात बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकुन दोन परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका केली तर वेश्याव्यवसाय करून घेणार्‍या एका महिलेला ताब्यात घेण्यात आले.

- Advertisement -

याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे टाकसेवाडी, पोखरी बाळेश्वरसह संगमनेर शहर आणि तालुक्यात अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक, स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, संगमनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, पोलीस नाईक मनोज पाटील, पोलीस हवालदार नितीन शिरसाठ, मंगल जाधव यांनी केली.

 

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -