घरमहाराष्ट्रनाशिकसाडे चार लाखाची लाच घेताना परिवहन आधिकारी जाळ्यात

साडे चार लाखाची लाच घेताना परिवहन आधिकारी जाळ्यात

Subscribe

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

हाडाखेड तपासणी नाक्यावर नेमणूक करण्यासाठी सहायक परिवहन अधिकार्‍याकडून साडे चार लाखाच्या लाचेची मागणी करणार्‍या प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेज तडवी यांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. विशेष म्हणजे दोनच महिन्यांपूर्वी तडवी यांच्यावर लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

देवपूर परिसरात ही घटना घडली. मुंबई- आग्रा महामार्गावर मध्यप्रदेशाच्या सिमेलग हाडाखेड नाक्यावर मोठया प्रमाणावर वाहनचालकांकडून चुकीच्या पध्दतीने पैशांची वसुली केल्या जात असल्याच्या तक्रारी आहे. या नाक्यावर चांगले उत्पन्न मिळत असल्याने नेमणुकीसाठी काही अधिकार्‍यांची धडपड असते. त्यासाठी वरीष्ठ अधिकार्‍यांना पैसे देण्याचे प्रकार घडतात. येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका अधिकार्‍याची नियमाप्रमाणे चक्राकार पध्दतीने या नाक्यावर नेमणूक होणे अपेक्षित होते. परंतु, या कामासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेज तडवी यांनी त्यांच्याकडून साडेचार लाखांची मागणी केली. संबंधित अधिकार्‍याने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी सापळा लावला. यावेळी तडवी यांनी संबंधीत अधिकार्‍याकडून लाचेची मागणी केली. तसेच लाच स्विकारण्याचा प्रयत्न करताच पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर देवपूर पोलीस ठाण्यात तडवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -