घरमहाराष्ट्रनाशिककाळाराम मंदिरात सीमोल्लंघन

काळाराम मंदिरात सीमोल्लंघन

Subscribe

पंचवटी : श्रीरामाच्या विजयाचा आनंद सीमोल्लंघन करून साजरा करण्याची परंपरा असलेल्या काळाराम मंदिरापासून बुधवारी (दि.५) यात्रा काढण्यात आली. मंदिरात पूजा करण्यात आल्यानंतर भोगमूर्ती पालखीतून नेण्यात आल्या. विजयादशमीच्या मुहुर्तावर सकाळी श्रीरामाला स्नान घालण्यात आले. नवीन वस्त्र अलंकाराने शृंगार करून परंपरागत वेशभूषा करण्यात आली. यादिवशी पराक्रमाचे स्वरुप म्हणून श्रीराम व लक्ष्मण यांच्या मूर्तीला सोन्याच्या मिशा लावण्यात आल्या होत्या. मंदिरात दुपारी शमीपूजन, शस्त्र पूजनासाठी प्रभू रामचंद्र चांदीच्या पालखीत विराजमान होऊन सिमोल्लंघनासाठी बाहेर पडल्या.

काळाराम मंदिरातील राम-लक्ष्मण व सीता या प्रधान देवतांच्या भोगमूर्ती फक्त दोन उत्सवाच्या वेळीच मंदिराच्या बाहेर पालखीतून नेण्यात येतात. त्यातील एक मुहुर्त चैत्र शुध्द एकादशीचे असून, त्यादिवशी नाशिकचा सर्वात मोठा रथोत्सव असतो. दुसरा मुहूर्त अश्विन शुक्ल पक्षातील विजयादशमीचा असल्याने त्यादिवशी भोगमूर्ती बाहेर पालखीतून काढल्या जातात. त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. विजयादशमीची मिरवणूक राम मंदिराच्या दक्षिण दरवाजा येथून सुरू झाली. यंदाचे मानकरी पूजाधिकारी देवेंद्रबुवा पूजारी यांच्या हस्ते शस्त्रपूजन, शमीपूजन करण्यात आले. यात्रोत्सवाच्या मार्गात भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -