घरमहाराष्ट्रनाशिकद्राक्ष पंढरीत द्राक्ष बागांच्या ऑक्टोबर छाटणीचा श्री गणेशा

द्राक्ष पंढरीत द्राक्ष बागांच्या ऑक्टोबर छाटणीचा श्री गणेशा

Subscribe

यंदा अधिक उत्पन्नाची अपेक्षा

निफाड : महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून राज्यात निफाड तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यात द्राक्ष, कांदा, ऊस, टोमॅटो, मका, सोयाबीन यासारखी आर्थिक फायदा करून देणारी नगदी पिके घेतली जातात. सध्या खरीप हंगाम सुरू असून, या हंगामाच्या शेवटी व रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच द्राक्ष वेलींची ऑक्टोबर छाटणी केली जाते. मात्र अनेक द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्ष वेलींची आरली छाटणी करतात यंदाही लवकरच द्राक्ष पंढरीत द्राक्ष छाटणीचा श्री गणेशा झाल्याचे चित्र आहे. द्राक्ष वेलींची आरली छाटणी हा शेतकर्‍यांच्या दृष्टीने मोठा जुगार समजला जातो.

कोरोना या विषाणूने भारतच नव्हे तर जगाला मोठा हादरा दिला दोन वर्षाच्या कालखंडात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शेती व शेती उत्पादनाची पुरी वाट लागली. अनेक शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागले शेतीतील पिकांचे उत्पादन घेऊन मातीमोल भावाने शेती पिके मागील दोन वर्षात विकावी लागली. यंदा मात्र शेती पिकाच्या उत्पादनातून चांगला आर्थिक फायदा होईल ही अपेक्षा ठेवून अनेक शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील मका, सोयाबीन, टोमॅटो यासारखी पिके घेतली आहे. मात्र कोरोनाचा कालखंड संपत असला तरी निसर्गाने अजून शेतकर्‍यांच्या पिच्छा सोडलेला नाही.

- Advertisement -

द्राक्ष पंढरीत अजूनही धो धो पाऊस बरसतच आहे एवढे होऊनही यंदा द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या अपेक्षा घेऊन द्राक्ष हंगाम सुरू करीत आहेत त्या दृष्टीने अनेक शेतकरी आपल्या द्राक्ष पिकांची ऑक्टोबर छाटणी आरली करीत आहे ऑक्टोबर छाटणी चा हंगाम सप्टेंबर ऑक्टोबर व नोव्हेंबर या तीन महिन्यात चालतो अनेक शेतकरी ऑक्टोबर मध्ये दहा पाच दिवसाच्या अंतराने छाटणी करतात. मात्र, त्यामुळे असंख्य द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची द्राक्ष एकाच वेळेस काढणीला येत असल्याने कदाचित द्राक्षाचे भाव पडण्याची शक्यता असते म्हणून अनेक द्राक्ष उत्पादक शेतकरी एक तर आरली छाटणी करतात नाहीतर लेट छाटणी करून लेट बागाचे उत्पादन घेतले जाते त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता जास्त असते.

द्राक्ष बागांची ऑक्टोबर छाटणी आरली करणे म्हणजे मोठा जुगार आहे या कालखंडात छाटणी केलेल्या द्राक्ष वेलीवर ज्यादाची फवारणी करावी लागते आम्ही २५ ऑगस्ट तर काही ६ सप्टेंबर रोजी आरली छाटनी करुन यंदाचा द्राक्ष हंगाम सुरू केला आहे
– विजय रामनाथ बोरगुडे, द्राक्ष उत्पादक -नैताळे

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -