घरमहाराष्ट्रनाशिकस्मार्ट कामांना पुरातत्व विभागाची परवानगीच नाही

स्मार्ट कामांना पुरातत्व विभागाची परवानगीच नाही

Subscribe

कारवाईसाठी आयुक्तांना पत्र, गोदाप्रेमींकडून आज वारसास्थळांना वाहणार श्रध्दांजली

पंचवटी : गोदाघाटावरील पुरातन निलकंठेश्वर महादेव मंदिर परिसरात स्मार्ट सिटीकडून सुरु असलेल्या विकासकामात, गणपती मूर्तीसह छोटे मोठे मंदिरे भग्न करण्यात आली. तसेच यशवंतराव महाराज पटांगण लगत असलेल्या साडे सहाशे वर्ष जुन्या दगडी घाटाच्या पायर्‍या तोडण्यात आल्या. या कामासाठी पुरातत्व विभागाची परवानगीच घेतली नसल्याची माहीती विभागाकडून देण्यात आली. स्मार्ट सिटी कंपनीवर उचित कारवाई करण्यात यावी यासाठी विभागीय आयुक्त पुरातत्व विभागाकडून पत्र पाठविण्यात आले आहे.

पुरातत्व विभागाने ७ मार्च २०२२ रोजी स्मार्ट सिटी कंपनी यांना पहिले पत्र देत निलकंठेश्वर महादेव मंदिर परिसर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येत असून सुशोभीकरण करण्यासाठी विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता पोकलेन आणि जेसीबीच्या साह्याने पुरातन पायर्‍या तोडल्या बाबत माहिती मिळताच त्या पायर्‍या पुर्वी होत्या त्या स्थितीत करण्याबाबत सांगितले होते. त्यानंतर ३ जून रोजी स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दुसरे पत्र देत निलकंठेश्वर महादेव मंदिर परिसर हा राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे त्यामुळे सुशोभीकरण करण्यासाठी पुरातत्वीक संकेतानुसार आणि मार्गदर्शक नुसार काम होणे अपेक्षित असताना कोणत्याही वास्तूविशारदांचे मार्गदर्शन घेतले गेले नसल्याबाबत पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

तसेच या तोडफोडीच्या कामामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या बाबत उल्लेख केला आहे. स्मार्ट सिटीला पत्र व्यवहार करून सर्व बांधकाम पूर्ववत जसे होते तसेच बांधून देण्याचे सांगितले असता जवळपास ९ महिने उलटून ही कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सुशोभीकरणाचे काम पुन्हा सुरू केले आहे. स्मार्ट सिटीकडून या वारसा स्थळांचे जीर्णोद्धार करण्याचे काम केले जात नसल्याने गोदाप्रेमींकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

आज आंदोलन

सुशोभिकरणाच्या नावाखाली स्मार्ट सिटी कंपनीकडून गोदाकाठावरील ऐतिहासिक वारसास्थळांचे अस्तित्व संपविण्याचे काम सुरू असल्याच्या निषेधार्थ आज सकाळी ११ वाजता यशवंतराव महाराज पटांगणावर हत्या करण्यात आलेल्या वारसा स्थळांना श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याचे देवांग जानी यांनी सांगितले.

- Advertisement -

काय म्हटले आहे पत्रात

गोदाघाटावरील नीलकंठेश्वर महादेव मंदिर पुरातन विभागाने संरक्षित वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. या मंदिराच्या तीनशे मीटर परिघात बांधकाम करण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. असे असताना स्मार्ट सिटीने मंदिर परिसरात दगडी फरशा व अन्य बांधकाम सुरू केले आहे. पुरातत्व विभागाची परवानगीची आवश्यकता असताना, स्मार्ट सिटीने अशी कोणतीही परवानगी पुरातत्व विभागाची घेतली नाही. असे खुद्द पुरातत्व खात्याने पत्रव्यवहार करतेवेळी पत्रात उल्लेख केला आहे.

पुरातत्व विभागाने विभागीय अधिकारी यांना स्मार्ट सिटी कंपनीवर उचित कारवाई करण्यात यावी याबाबत पत्र दिले आहे. ते स्वागतार्ह आहे. परंतु वारसा स्थळांचा हत्याकांड करणार्‍या नाशिक स्मार्ट सिटी कंपनीला गोदेचं पाणी दाखविण्याची. पुरातन सांडव्यामुळे नावलौकिक असलेल्या सांडव्यावरचा सप्तश्रुंगी देवीचा सांडवा तोडला. गणपती मूर्तीसह छोटी मंदिरे भग्न केली. गोदापात्रातील सुस्थितीत असलेल्या ६५० वर्ष जुन्या पायर्‍या तोडल्या. पुनः बांधणीचे आश्वासन देऊन वर्ष उलटून गले तरी, स्मार्ट सिटी जिर्णोद्धाराचे काम करत नाही. याला विरोध दर्शवण्यासाठी ’हत्या झालेल्या वारसा स्थळांना श्रध्दांजली’ कार्यक्रम आयोजित केला आहे.– देवांग जानी (गोदाप्रेमी)

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -