घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमविप्रची मतमोजणी अजूनही सुरू नाही; अफवांचे पीक

मविप्रची मतमोजणी अजूनही सुरू नाही; अफवांचे पीक

Subscribe

दुपारचे २.३० झाले तरी अद्याप मतमोजणी सुरु झालेली नाही. असे असतानाही अमुक एक पॅनल आघाडीवर अशा अफवांचे पीक आले आहे.

जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मविप्र समाज शिक्षण संस्थेचा अंतिम निकाल आज सोमवारी (दि.29) जाहिर होणार आहे. प्रत्यक्षात मतमोजणीची प्रक्रिया दुपारी १ वाजता सुरु होईल अशी अपेक्षा असताना दुपारचे २.३० झाले तरी अद्याप मतमोजणी सुरू झालेली नाही. असे असतानाही अमुक एक पॅनल आघाडीवर अशा अफवांचे पीक आले आहे.

आज (दी.२९) सकाळी ८ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेच्या मुख्यालय कॅम्पस परिसरातील मराठा हायस्कूलच्या बाजूला असलेल्या कै. तुकाराम रौदळ सभागृहात ही मतमोजणी पार पडत आहे. सुरवातीला पदाधिकारी जागांसाठीच्या मतपेट्या उघडण्यात आल्या आहेत. त्यातून २ फेर्‍याच्या मतपत्रिका बाहेर काढून प्रक्रियेस सुरवात करण्यात आली आहे. या मतपत्रिकानची रंगानुसार विभागणी करून मंतमोजणीला सुरवात होईल. खरे कल दुपारी १ वाजेच्या जेवणाच्या सुट्टीनंतरच समोर यायला सुरवात होणे अपेक्षीत होते. परंतु प्रत्यक्ष मतमोजणी अद्यापही सुरु झालेली नाही. त्यामुळे कल दुपारी ३.३० नंतरच कळायला सुरुवात होणार आहे. कारण सर्व मंतपत्रिक एकत्र करायच्या त्यानंतर त्यांची पुन्हा रंगनिहाय विभागणी करायची, त्यानंतर २५ मतांचे गठ्ठे बनवायचे अशी सगळी प्रक्रिया असल्याने खरे कल दुंपारनंतरच समोर येऊ शकतील.
दरम्यान, सेवक संचालकांच्या ३ तसेच, पदाधिकारी व संचालक अश्या एकूण २४ जागांवर ही मतदान पार पडले. संचालक मंडळासाठी एकूण ९ हजार ६७७ म्हणजेच ९४.६४ टक्के मतदान झाले तर सेवक संचालकांच्या ३ जागांसाठी ४०९ इतके मतदान झाले. सध्या मतमोजणी प्रक्रियेच्या ठिकाणी परिवर्तन पॅनलचे प्रमुख नितीन ठाकरे, बाळासाहेब क्षीरसागर, तर प्रगतीच्या वतीने नीलिमा पवार यांचे सुपुत्र प्रणव पवार, विशाल सोनवणे, बाळासाहेब खताळे आदि उपस्थित आहेत.

- Advertisement -

सेवकांचे निकाल तासाभरात

सेवकांच्या ३ जागांसाठी सेवक विरुद्ध समर्थ या दोन पॅनल मध्ये थेट सामना होत आहे. रविवारी पडलेल्या मतदानात एकूण ४०९ सेवकांनी मतदान केल आहे. सेवक मतदारांचा आकडा संभासदांच्या तुलनेने फारच कमी आहे. त्यामुळे सेवक संचालकांच्या जागेसाठीची मतमोजणी अवघ्या तासाभरात पूर्ण होईल.

 

- Advertisement -

 

 

मविप्रची मतमोजणी अजूनही सुरू नाही; अफवांचे पीक
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -