घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसप्तश्रुंगी मातेचे दर्शन आता २४ तास घेता येणार, भाविकांच्या सोयीसाठी निर्णय

सप्तश्रुंगी मातेचे दर्शन आता २४ तास घेता येणार, भाविकांच्या सोयीसाठी निर्णय

Subscribe

नाशिक : दिवाळीच्या सुट्ट्यांच्या अनुषंगाने साडेतीन शक्तिपिठापैकी महत्वपूर्ण स्थान असलेल्या आदिशक्ती सप्तश्रुंगी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश राज्यातूनही लाखो भाविक याकाळात सप्तश्रुंगी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. मागील दोन वर्ष कोविडमुळे तसेच नवरात्री आधी मूर्तीच्या सवर्धन प्रक्रियेसाठीही मंदिर बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळेही अनेक भाविकांना देवीचे दर्शन घेता आले नव्हते. दिवाळीच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालय, कार्यालय आदींना सुट्ट्या असतात त्यामुळे येणार्‍या काही दिवसात वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने दर्शन २४ तास खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.

गुरुवार (दी.२७ ऑक्टोबर) ते रविवार (दी.१३ नोव्हेबर) या तीन आठवड्यांच्या कालावधीत आदिशक्ती सप्तश्रुंगी देवीचे मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले राहणार आहे. त्याअनुषंगाने भाविकांच्या गर्दीची योग्य ती विभागणी तसेच भक्तनिवास, सुरक्षा व इतर बाबींवर पडणार ताण विभागून भाविकांना श्री भगवती दर्शनाचा विशेष लाभ घेता येईल. या दृष्टीने सदरचा निर्णय विश्वत संस्थेने घेतला आहे. दरम्यान आवश्यतेनुसार श्री भगवती मंदिरातील पर्यवेक्षक, सेवेकरी, सुरक्षा रक्षक, मदतनीस तसेच देणगी कार्यालय येथील कर्मचारी आदीसह आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता तसेच फ्युनीकुलर रोप वे ट्रॉली सुविधा देखील भाविकांना सुरू असेल असे नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -