घरमहाराष्ट्रनाशिक...आणि हाता-पायावर रांगणारा ‘परशराम’ पुन्हा उभा रहिला

…आणि हाता-पायावर रांगणारा ‘परशराम’ पुन्हा उभा रहिला

Subscribe

अटल अभियानाच्या सहाय्याने झालेल्या शस्त्रक्रियेने आयुष्याला मिळाली नवसंजीवनी

सुरगाणा  तालुक्यातील अतिदुर्गम दांडीचीबारी या डोंगराच्या पायथ्याशी वसलेले कुकूडमुंडा हे जेमतेम अडीचशे ते तीनशे लोकवस्तीच गाव. येथील २५ ते ३० वर्षाचा युवक परशराम वाघमारे मोलमजुरीनिमित्त पिंपळगाव, निफाड, खेडगाव, लासलगाव भागात जात असे. द्राक्षे निर्यात पॅकींगचे काम शीतगृहामध्ये काम करीत असे. सततच्या बैठकीमुळे थंड हवामानाचा परिणाम खुब्यांवर झाला. यामुळे त्याचे दहा-बारा वर्षापासून चालणे- फिरणे बंद झाले. शेवटी तो प्राण्याप्रमाणे हातापायावर रांगत. बरे होण्यासाठी अगदी बुवाबाजी, आयुर्वेदिकसह विविध उपचार केले. जीवन संपवावे की काय, असे नकारत्मक विचार त्यांच्या मनात घोळत होते. मात्र, महाअटल शिबिराच्या माध्यमातून कृत्रिम सांधेरोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि रांगणारा परशराम सामान्य माणसांसारखा विनाआधार चालण्यास लागला आहे.

सामाजिक कार्यकर्ते रमेश थोरात यांनी पराशरामला बघितल्यानंतर नांदूरी येथील अटल महाआरोग्य शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन केले. प्रसंगी थोरात यांनी पदरमोड करुन खासगी वाहन दिले. गतवर्षी सप्तशृंगी गड पायथ्याशी महाअटल आरोग्य शिबिर झाले. यात परशरामची प्राथमिक तपासणी झाली. थोरात यांनी मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात खासगी वाहनाने नेऊन पालकमंत्र्याची शिफारस घेऊन शासनाकडून साडेतीन लाख रुपये मदत मिळवून दिली.

- Advertisement -

जे.जे.रुग्णालयात त्याच्यावर कृत्रिम सांधेरोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. यामुळे परशराम पुन्हा चालायला लागला आहे. ही सारी कहाणी सांगताना कुटूंबाच्या चेहर्‍यावर हसू तर डोळ्यांतून आंनदाश्रू वाहत होते.

परशराम वाघमारे परिवारा व सामाजिक कार्यकर्ते रमेश थोरात यांच्या समवेत, दुसर्‍या छायाचित्रात शस्त्रक्रियेपूर्वी परशरामची परिस्थिती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -