घरमहाराष्ट्रनाशिकलायन्स क्लबतर्फे अनोखी भेट उभारणार शाळेची इमारत

लायन्स क्लबतर्फे अनोखी भेट उभारणार शाळेची इमारत

Subscribe

शाळेच्या बांधकामाला 15 लाख रुपये खर्च येणार

नाशिक : लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टारने पुढाकार घेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावी हर्ष गावात शाळेचे बांधकाम करुन देण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्यानुसार या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा रविवारी (दि.२२) विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.डिस्ट्रिक्टचे नूतन प्रांतपाल राजेश कोठावदे, स्वामी श्री कंठानंद, लायन्स क्लब ऑफ नासिक स्टारच्या अध्यक्षा सारिका कलंत्री, महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळाचे सचिव बाळासाहेब ढोबळे, सरपंच बाबुराव बांगरे, उपसरपंच प्रशांत कर्डक, भगवान मधे यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.

शाळेच्या बांधकामाला 15 लाख रुपये खर्च येणार आहे. येथील शाळेत 100 हून अधिक आजूबाजूच्या आदिवासी गावांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्याची शाळा इमारत 40 वर्षे जुनी असून, माती-विटांची व पत्र्याची आहे.नव्या इमारतीत प्रशस्त वर्ग, मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, सौरऊर्जा यंत्रणा, कम्प्युटर लॅबचा समावेश असेल. आर्किटेक्ट नीलेश कटारिया व नितीन वाघूळदे, तसेच कंत्राटदार जितेंद्र वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम केले जाईल.

- Advertisement -

नवीन शैक्षणिक वर्ष नूतन इमारतीत सुरू होईल, अशी ग्वाही सारिका कलंत्री यांनी दिली. कार्यक्रमाचा प्रारंभ स्वागत गीताने झाला. सचिव अभय पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालन उर्जा पाटील यांनी केले. यावेळी पर्मनंट प्रोजेक्टचे प्रमुख सीए राम डावरे, संतोष कलंत्री, निशा भरबत, नीलिमा डावरे, डॉ. देवेन पाठक, अमित पाटील, मनीषा लद्धा, दिव्या पाठक, रत्नमाला चांडोले, पल्लवी पाटील, शिल्पा व ऋग्वेद मराठे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -