घरमहाराष्ट्रनाशिकपंचवटी येथे महिलेने एकाचवेळी तीन बाळांना दिला जन्म

पंचवटी येथे महिलेने एकाचवेळी तीन बाळांना दिला जन्म

Subscribe

तिळ्यांचा जन्म ही दुर्मिळ घटना मानली जाते.

पंचवटी : महिलेने एकाचवेळी दोन बाळांना जन्म देणे ही बाब सर्वसामान्य झाली असली तरीही, तिळ्यांचा जन्म ही दुर्मिळ घटना मानली जाते. अशाच एका घटनेत म्हसरूळ-मखमलाबाद येथील एका महिलेने तिळ्यांना जन्म दिल्याने रुग्णालयासह तिच्या कुटुंबियांनी जल्लोषात दोन मुलींसह एका मुलाच्या जन्माचे जल्लोषात स्वागत केले. विशेष म्हणजे  तीन बाळांसह त्यांच्या मातेचीही प्रकृतीठणठणीत आहे.नाशिक-म्हसरूळ येथील ३० वर्षीय गायत्री गणेश महाले यांना प्रसुतीसाठी पंचवटीतील येथील शारदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्याच दिवशी रात्री त्यांची प्रसूती झाली. यावेळी त्यांनी एकापाठोपाठ तीन बाळांना जन्म दिला. या तिनही चिमुकल्यांच्या जन्मवेळेत अवघ्या काही मिनिटांचे अंतर होते. आई आणि तिनही बाळांची प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. या तीनही बाळांचे वजन अनुक्रमे २ किलो १०० ग्रॅम, २ किलो व १ किलो ९०० ग्रॅम आहे. या सर्वांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी भानसी व महाले कुटुंबियांकडून निवासस्थानी आईसह तीन चिमुकल्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.

- Advertisement -

गायत्री व गणेश वामन महाले यांना लग्नानंतर तब्बल आठ वर्षांनी अपत्यप्राप्ती झाली. दरम्यान, आईसह सर्व लहानगे सुखरुप असल्याने या तीनही चिमुकल्यांच्या पावलांनी महाले कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. गायत्री यांच्या गर्भात तीन भ्रूण वाढत असल्याचे डॉक्टरांनी सोनोग्राफी रिपोर्ट पाहून आधीच सांगितले होते.
त्यामुळे गायत्री यांची गरोदरपणात महाले कुटुंबियांकडून विशेष काळजी घेतली जात होती. मात्र, तरीही या कुटुंबाला प्रसुतीची चिंता भेडसावत होती.

माझे लग्न सन-२०१४ मध्ये झाले आहे. यानुसार आमच्या लग्नाला गेले ८ वर्षे झाले असता आम्हाला अपत्य होण्यासाठी अडचणी येत होत्या. अपत्य होण्यासाठी योग्य उपचार घेण्यासाठी माझ्या माम सासू तथा माझी महापौर सौ. रंजना भानसी यांनी मार्ग दाखवला आहे. त्यानुसार आज आम्हाला एक..दोन नव्हे तर तीन अपत्य एकाचवेळी आम्हाला परमेश्वराने दिले आहे.यासाठी डॉ.नंदा ठाकरे यांचे आम्ही मनापासून आभार मानले.”
– गायत्री महाले, अपत्यांची आई

मला जेव्हा सोनोग्राफी रिपोर्टनुसार समजले की, गायत्री पेशंटच्या पोटात तीन बाळ आहेत. तेंव्हा मी सुद्धा विचारात पडले होते. पण हे समजताच गायत्रीला खूप आनंद झाला होता. या दरम्यान मात्र तीने कोणत्याही प्रकारची भिती न ठेवता एकापाठोपाठ तीन बाळांना जन्म देण्यासाठी माझ्या मार्गदर्शनाला चांगला प्रतिसाद दिला. तीन बाळांना एकाचवेळी जन्म देण्याच्या केसेस खूप कमी घडतात. तर आज तीनही बाळं व आई सुखरूप असून या प्रसंगी तीन बाळांचे आई- वडील आणि महाले कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.याचा मला अभिमान आहे.
– डॉ. नंदा ठाकरे, शारदा हॉस्पिटल,नाशिक

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -