Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक चित्तथरारक एमआरएफ सुपरक्रॉस रेसिंग स्पर्धेची उत्सुकता शिगेला; २ दिवस बाकी

चित्तथरारक एमआरएफ सुपरक्रॉस रेसिंग स्पर्धेची उत्सुकता शिगेला; २ दिवस बाकी

Subscribe

नाशिक : एमआरएफ मोग्रीप एफएमएससीआय राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धा ७ मे रोजी नाशिक येथे संपन्न होत आहे. एमआरएफ मोग्रीप एफएमएससी आय राष्ट्रीय सुपरक्रॉस विजेतेपद स्पर्धेचे हे तेवीसावे वर्ष असून २०२२ सालच्या स्पर्धेतील ही तिसरी फेरी आहे.

या स्पर्धेचे आयोजन ठक्कर डोम, सिटी सेंटर मॉल जवळ, नाशिक येथे होणार असून शनिवारी (दि. ६ मे) रोजी सकाळी १० वाजल्या पासून वाहनांची व कागदपत्रांची तपासणी तसेच दुपारी ३ ते ५:३० पर्यंत सराव होणार आहे . तर मुख्य स्पर्धेला रविवार ७ मे रोजी सकाळी ९.३० वा. प्रारंभ होणार आहे . तरी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या पर्वणीच लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक शाम कोठारी व सुरज कुटे यांनी केले आहे.

- Advertisement -

भारत सरकार व आंतरराष्ट्रीय ऑलीम्पिक संघटनेच्या मान्यताप्राप्त फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया एफएमएससीआय या मोटरस्पोर्ट्स महासंघाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. ७ वर्ष राष्ट्रीय विजेतेपदाचा मान मिळवलेल्या शाम कोठारी यांच्या अधिपत्याखालील गॉड्स्पीड रेसिंग या संस्थेकडे या स्पर्धेचे सर्व अधिकार असून मागील २० वर्षांपासून गॉडस्पीड रेसिंग या स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन करीत आहे. नाशिक मधील स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाची धुरा सुरज कुटे, शमीम खान, अंकित गज्जर व सहकारी यांनी सांभाळली असून ट्रॅक बनवण्याचे अत्यंत महत्वाचे व जिकरीचे कामही त्यांनी हाताळले आहे.

भारतातून विविध आठ गटांमध्ये विभागून तब्बल १२५ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेसाठी एफएमएससीआयचे मुख्य प्रबंधक म्हणून अश्विन पंडित हे काम बघणार आहेत तर सत्यजित नायक व श्रीरंग मत्से हे अधिकारी विशेष निमंत्रित असणार आहेत. वाहन तपासणीस म्हणून अमित वाघचौरे तर तांत्रिक समिती प्रमुख म्हणून रवी वाघचौरे हे काम बघणार आहेत. स्पर्धेमध्ये ऋग्वेद बारगुजे ,श्लोक घोरपडे याच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे. या स्पर्धेसाठी एम आर एफ टायर लि.टी व्ही एस मोटार कंपनी ,पेट्रोनास स्प्रिंटा, सिडवीन एनर्जी आणि आइओसी सर्वो हे प्रायोजक लाभलेले आहेत. हर्षल कडभाने हा एकमेव स्थानिक स्पर्धक सहभागी होणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -