घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगद्दारांचे बारा वाजवणार; ठाकरे गटाचा निर्धार, मालेगावच्या सभेची जय्यत तयारी

गद्दारांचे बारा वाजवणार; ठाकरे गटाचा निर्धार, मालेगावच्या सभेची जय्यत तयारी

Subscribe

नाशिक : उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे हा कानमंत्र घेऊनच उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत सैनिक आता नव्या जोमाने रणांगणात उतरले असून ते तुमचे बारा वाजवून तुम्हाला पळता भुई थोडी करतील,असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी शिंदे गटाला दिला. २६ मार्च रोजी मालेगाव येथे उध्दव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी शालीमार कार्यालयात पदाधिकार्‍यांचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता यावेळी करंजकर बोलत होते.

यावेळी बोलतांना शिवसेना पदाधिकार्‍यांनी शिंदे गटावर तोफ डागली. उद्धव ठाकरेंशी गद्दारी करणार्‍यांविरुद्ध आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून मोठी मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्या प्रभागात जाऊन त्यांच्याविरुद्ध आम्ही रान उठवून त्यांचा पर्दाफाश केल्याने आता ते तोंड लपवून पळत आहेत. यापुढे आम्ही त्यांची अवस्था आणखी वाईट करणार आहोत, असे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी सांगितली. भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी विधानसभेच्या फक्त 48 जागा तुम्हाला देण्याची तयारी दर्शविली यावरूनच शिंदे गटाची किंमत लक्षात आली. महापालिका निवडणुकीतही बोटावर मोजण्याइतक्या जागांवरच शिंदे गटाची बोळवण केली जाईल आणि हेच त्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरतील असा इशाराही महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिला.

- Advertisement -

आगामी महापालिका तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या जागांवर गद्दार तर औषधालाही उरणार नाहीत, असे माजी आमदार योगेश घोलप आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले. विलास शिंदे आणि डी.जी.सूर्यवंशी यांचीही यावेळी भाषणे झाली. यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, उप जिल्हाप्रमुख महेश बडवे, युवासेना जिल्हाधिप्रमुख राहूल ताजनपुरे, विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक वैभव ठाकरे,मध्य नाशिक विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, पश्चिम नाशिक विधानसभा प्रमुख सुभाष गायधनी, माजी महापौर नयना घोलप, महिला आघाडी जिल्हा संघटक शोभा गटकळ,मंगला भास्कर,देवानंद बिरारी,संजय चव्हाण,विकास गिते आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -