घरमहाराष्ट्रनाशिकआझाद मैदानावर हजारो मराठे कुटुंबासह थाटणार संसार

आझाद मैदानावर हजारो मराठे कुटुंबासह थाटणार संसार

Subscribe

संभाजी राजेंसह बेमुदत उपोषण; नाशिकमध्ये त्रिसदस्यीय समिती

नाशिक : आझाद मैदानावर खासदार संभाजी राजे छत्रपतींसोबत नाशिक जिल्ह्यातील हजारो कुटुंब उपोषणाला बसणार असल्याची घोषणा सकल नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने नाशिकमध्ये केली.शनिवारी (दि.26) छत्रपती संभाजी राजे बेमुदत उपोषण करणार आहेत.औरंगाबाद रोडवरील वरदलक्ष्मी लॉन्स येथे बुधवारी (दि.23) जिल्हा मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली. मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ झाल्यानंतर मराठा समाजाला न्याय मिळण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन खा. संभाजी राजें छत्रपती यांनी राज्य आणि केंद्र सरकारला मराठा समाजाचे उभय सरकारांच्या हातात असलेले मुद्दे सोडवून दिलासा देण्याचा प्रस्ताव दिला होता.

 केवळ प्रस्ताव देऊन छत्रपती शांत बसले नाहीत तर निवडक सहा मुद्दे काढून त्याची अंमलबजावणी सरकारने केली तरी मराठा समाजाचे बहुतांश प्रश्न मार्गी लागू शकतात, अशी यामागची राजेंची प्रामाणिक भूमिका आहे. जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव कुटुंबासह आझाद मैदानावर उपस्थित राहून राजेंसोबत आंदोलनात सहभागी होतील. आझाद मैदानावर जाण्यासाठी गाड्यांचे नियोजन करण्यासाठी तीन समाजबांधवांची कमिटी स्थापन केली आहे. त्यामध्ये अमित नडगे, सागर पवार व अमोल जगळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चा नाशिकच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -

यावेळी करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, मनिषा पवार, शिवाजी मोरे, उमेश शिंदे, विजय खर्जुल, अशिष हिरे, विलास जाधव, सचिन पवार, संदीप लबडे, बंटी भागवत, संजय सोमासे, विशाल कदम, दिनकर कांडेकर, प्रमोद जाधव, खंडू आहेर, वंदना कोल्हे, अस्मिता देशमाने, पूजा धुमाळ, माधवी पाटील, पूजा तेलंग, पुनम पवार, सुनील भोर, शरद शिंदे, नारायण जाधव, गणपत जाधव, प्रताप जाधव, भूषण तनपुरे, योगेश गांगुर्डे, गिरीश आहेर, कुंदन हिरे, सचिन शिंदे, गौरव पवार, कल्पेश पाटील, मयूर शिंदे, आकाश हिरे, रोहित श्रीवास्तव, निलेश शेजुळ, सुभाष शेजवळ, दिनेश चव्हाण, दिनेश नरवडे, विश्वास तांबे, उत्तम कापसे, समाधान हिरे, संजय निकम, नीलेश कचवे, दादा जाधव, उषा पाटील, भारती जाधव आदी उपस्थित होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -