घरमहाराष्ट्रनाशिकबंद घरांमध्ये चोरट्यांची दिवाळी; दागिने लंपास

बंद घरांमध्ये चोरट्यांची दिवाळी; दागिने लंपास

Subscribe

शहराच्या विविध भागांत वाढल्या चोरीच्या घटना

नाशिक- दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या बंद बंगले व फ्लॅटमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरात दोन चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. दोन्ही घरफोडीत चोरट्यांनी सुमारे एक लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला आहे.याप्रकरणी अंबड आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या घटनेनुसार, सिडकोतील अश्विननगरमधील जयेश गोविंद महाले हे कुटुंबियांसमवेत ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान बाहेरगावी गेले होते . त्यांच्या गैरहजेरीत चोरट्यांनी बंद घराच्या खिडकीचे गज तोडून चोरी केली.चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेले सोने व चांदीचे दागिने लंपास केले.

दुसर्‍या घटनेनुसार,रामदास स्वामी नगरमधील मंगल सुरेश बर्वे यांचे भाऊ कुटुंबियांसमवेत रविवारी(दि.७)बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या नवरंग सोसायटीतील पगारे भवन या बंगल्याच्या बेडरूमची स्लाईडींग खिडकीतून प्रवेश करीत पलंगावर ठेवलेली पर्स चोरून नेली. या पर्स मध्ये ५ हजाराची रोकड आणि दागिने असा सुमारे ५० हजाराचा ऐवज लंपास केला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -