घरमहाराष्ट्रनाशिकचोरट्या महिलांसह तीन अल्पवयीनांना अटक

चोरट्या महिलांसह तीन अल्पवयीनांना अटक

Subscribe

तीन चोरट्यांना अंजनेरीतील एका लॉजमधून तर अल्पवयीन चोरट्यांना राजीवनगरमधून घेतले ताब्यात

नाशिक येथील एका दुकानातून तीन चोरट्यांसह इंदिरानगर परिसरात मोबाईल चोरी करणार्‍या तीन अल्पवयीन चोरट्यांना इंदिरानगर पोलिसांनी अटक केली. तीन चोरट्यांना अंजनेरीतील एका लॉजमधून तर अल्पवयीन चोरट्यांना राजीवनगरमधून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी महागडे मोबाईल, रोकड व दुचाकी जप्त केली आहे.

सोनाली अर्जुन कांबळे (२८, रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर) उन्नती कैलास खाडम (३५ रा. सहवासनगर झोपडपट्टी) व त्यांचा साथीदार नीलेश उर्फ विकी शशिकांत खंडीझोड (२३ रा. श्रमिकनगर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. साईनाथनगर येथील भावे प्लास्टो दुकानात शुक्रवारी (दि. २८ जून) दोन महिला आणि एक पुरुष बनावट ग्राहक म्हणून आले. त्यांनी दुकानातील महिलेला बोलण्यात गुंतवत लक्ष विचलित करून पर्स व गल्ल्यातील तीन हजार लंपास केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शोध पथकाने तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवत तपास सुरू केला. अंजनेरी येथील एका लॉजमध्ये संशयित असल्याचे पोलिसांना समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंकूश दांडगे, दत्तात्रय पाळदे, राजेश निकम, रियाज शेख, भगवान शिंदे, राजू राऊत, दत्तात्रय गवारे, विमल पाचोरे यांच्या पथकाने अंजनेरीत सापळा रचत तिघांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून पर्स, तीन हजार रुपयांची रोकड, मोबाईल, दुुचाकी जप्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -