घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक विभागातील ९ तहसिलदारांच्या बदल्या

नाशिक विभागातील ९ तहसिलदारांच्या बदल्या

Subscribe

निवडणूकीशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबध येणारा अधिकारयांच्या बादल्यांचे आदेश पारित करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर अधिकारयांच्या बदल्यांचे आदेश शासनाने पारित केले असून आज नाशिक विभागातील ९ तहसिलदारांच्या बदल्या करण्यात आल्या. एकाच पदावर तीन वर्ष किंवा त्याहून अधिक काळ कार्यरत असलेले तसेच निवडणूकीशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबध येणारा अधिकारयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.


हे ही वाचा – जिल्ह्यातील उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या

- Advertisement -

यामध्ये दिंडोरीचे तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांची जळगाव येथे तहसिलदार निवडणूक शाखा येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नाशिक उपविभागीय कार्यालयातील नायब तहसिलदार पंकज पवार यांना पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. अक्कलकुवाचे तहसिलदार नितीनकुमार देवरे यांची धरणगाव येथे बदली करण्यात आली आहे. जळगाव येथील निवडणूक शाखेचे तहसिलदार सुरेश थोरात यांची सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी नंदुरबार येथे बदली करण्यात आली आहे. पेठचे तहसिलदार हरिष सोनार भामरे यांची अक्कलकुवा नंदुरबार येथे बदली करण्यात आली आहे. नगरजिल्हयातील राहता तहसिलदार माणिक आहेर यांची जळगाव येथे सामान्य प्रशासन विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी धरणगाव तहसिलदार मिलींद कुलथे यांची बदली करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा करमणुक अधिकारी मिलींद कुलकर्णी यांची शहादा तहसिलदारप मनोज खैरनार यांच्या बदलीने रिक्त होणारया जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -