घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रत्र्यंबक मंदिरात चेंगराचेंगरीची शक्यता, गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना आखण्याची मागणी

त्र्यंबक मंदिरात चेंगराचेंगरीची शक्यता, गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना आखण्याची मागणी

Subscribe

त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी दररोज हजारोच्या संख्येने भाविक येत असतात मात्र, मंदिर प्रशासनाकडे गर्दी नियंत्रणासाठी कोणतीही व्यवस्था नाही त्यामुळे येथे चेेंगराचेंगरी होण्याचा धोका संभवतो. मात्र गर्दीवर नियंत्रणासाठी कोणतीही उपाययोजना न करता ट्रस्टकडून दर्शन शुल्क आकारले जात असल्याचा आरोप करत त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी भाविकांच्या सुरक्षेचा मुददा उपस्थित केला आहे. यासंदर्भात त्यांनी भारतीय पुरातत्व विभागाला पत्रही पाठवले आहे.

शिंदे यांनी भारतीय पुरातत्व विभागाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, त्र्यंबकेश्वर मंदिर हे राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण औरंगाबाद परिमंडहाच्या अखत्यारित येते. मंदिराची मालकी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची आहे आणि त्याची देखभाल, जतन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारची आहे. मंदिरात दररोज सुमारे वीस ते पंचवीस हजार भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र प्रत्यक्षात यात्रेकरूंची वहन क्षमता पाच ते दहा हजारांच्या आसपास आहे. मुख्य मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी भाविकांना तीन ते चार तास लागतात.

- Advertisement -

भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा किंवा उपाययोजना येथे आखण्यात आलेल्या नाहीत. यामुळे भविष्यात चेंगराचेंगरीसारखी अप्रिय घटना देखील घडू शकते. भाविकांसाठी कोणताही व्यवस्था नसतांना मंदिर ट्रस्टकडून बेकायदेशीर रित्या पेड दर्शन व्यवस्थेच्या नावाखाली लाखो रूपये गोळा केले जातात. विशेष म्हणजे या बेकायदेशीर शुल्कवसुलीबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्याचे शिंदे यांनी या पत्रात नमूद केले आहे. २०१७ मध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा संपन्न होणार आहे. कुंभमेळा काळात भाविकांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने मंदिर परिसराला भेट देउन भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी मंदिर परिसरात गर्दी व्यवस्थानासाठी योजना तयार करावी अशी मागणी ललिता शिंदे यांनी भारतीय पुरातत्व विभागाकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -