घरमनोरंजनKili Paul Video: किली पॉलचे महामानवाला अभिवादन!

Kili Paul Video: किली पॉलचे महामानवाला अभिवादन!

Subscribe

टांझानियाचा प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार किली पॉल (Kili Paul). किली पॉल हे सध्या इंटरनेटवरील एक प्रसिद्ध नाव आहे. त्याचे सोशल मीडिया अकाउंटवर लाखो फॉलोअर्स आहेत. पॉल अनेकदा बॉलिवूड गाण्यांचे लिप्सिंग करताना किंवा डान्स करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. चाहते देखील किली पॉल याच्या प्रत्येक व्हिडीओला खूप प्रेम देतात. दरम्यान आता किली पॉल मराठी गाण्यांच्या प्रेमात पडला आहे. अनेक मराठी गाण्यांवर किलीने रिल्स केले आहे. आता बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti 2024) किलीने एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे.

या नवीन रिल व्हिडीओमध्ये किली ‘कंबर कसून बांधणं असं रमाचं नांदणं’ हे भीम गीत गाताना दिसत आहे. किलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आनंद शिंदेच्या स्वरात किली पॉलने महामानवाला अभिवादन केलं आहे. हा व्हिडीओ शेअर करताना, किली पॉलने ‘जय भीम’ (Jai Bhim) असं कॅप्शन दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kili Paul (@kili_paul)

- Advertisement -

 किलीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. जय भीम, आंबेडकरवादी किली पॉल, किली पॉल दररोज भारतीयांचं मन जिंकत आहे, भावाने मन जिंकलं, किली पॉलबद्दलचा आदर आणखी वाढलाय, जय शिवराय, जय भीम, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

kili paul

- Advertisement -

सोशल मीडियावर किलीच्या बऱ्याच मराठी गाण्यांच्या व्हिडीओंची बरीच चर्चा होताना दिसते. “काय सांगू राणी मला गाव सुटना”, “मावळं आम्ही वादळ आम्ही” आणि “नांदण नांदण रमाचं नांदण” या मराठी गाण्यांवरील व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. नेटकऱ्यांचा उत्तम प्रतिसादही त्यांना मिळाला आहे.

______________________________________________________

हेही पहा : 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -