घरमहाराष्ट्रनाशिकवॉटर व्हीलमुळे थांबणार आदिवासी बांधवांची पायपीट

वॉटर व्हीलमुळे थांबणार आदिवासी बांधवांची पायपीट

Subscribe

गावातील कुटुंबांना पाण्यासाठी करावी लागणारी कसरत होणार कमी

नाशिक:त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडूनही आदिवासी पाड्यावर अजूनही महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. याला पर्याय म्हणून वेल्स ऑन व्हील्स आणि युनायटेड व्ही स्टँड संस्थेने सामाजिक जाणिवेतून एकत्र येत गावातील सर्व ६० कुटुंबांसाठी वॉटर व्हील उपलब्ध करून दिले आहेत.

त्र्यंंबकेश्वर येथील हेधपाडा गावाचा परिसर डोंगराळ आणि पाण्याची योग्य सोय नसल्यामुळे गावातील कुटुंबाना रोजच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. राहत्या ठिकाणापासून पाण्याच्या सोयीचं ठिकाण दूर अंतरावर म्हणजे चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे. उंच आणि त्यात डोंगराळ खडक असल्यामुळे डोक्यावर हांडा घेऊन पाण्यासाठी करावी लागणारी ही रोजची कसरत स्थानिक लोकांसाठी जीवघेणी होती. यालाच पर्याय म्हणून वेल्स ऑन व्हील्स आणि युनायटेड व्ही स्टँड संस्थेने सामाजिक जाणिवेतून एकत्र येऊन गावातील सर्व ६० कुटुंबासाठी वॉटर व्हील उपलब्ध करून देण्यात आले. जेणेकरून त्यांची जीवघेणी कसरत कमी होऊन पाणी आणणे सोयीस्कर होणार आहे. हे व्हील ५० लिटरचे असून त्यात चार हांडे पाणी बसते व ते सहज हाताने लोटत आणता येते.

- Advertisement -

डोक्यावर पाणी आणल्यामुळे माणेचे, मणक्याचे व कंबरदुखीचे अशे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. या ड्रममुळे कमी कष्टात सहज पाणी आणता येईल व आजारपणदेखील कमी होणार. ही भेट संपूर्ण गावासाठी एक उत्तम आरोग्यदायी वस्तू ठरली. त्यामुळे संपूर्ण गावाने संस्थेच्या सदस्यांचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर महिला सदस्यांनी सॅनिटरी नॅपकिन्स, त्याचा वापर, त्याची जनजागृती गावातील महिलांमध्ये केली व त्याचे वाटप केले. यावेळी वेल्स ऑन व्हील्स संस्थेचे अजय देवरे, गोकुळ ढोमसे, विजय देवरे, अनुप मोरे, नारायण आणि युनाईटेड वी स्टँड फाउंडेशनचे सागर मटाले, नीलेश पवार,
अ‍ॅड. हनी नारायणी, स्मृती आवारे आदी उपस्थित होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -