घरताज्या घडामोडीया लॉकडाऊनचे करायचे काय ? व्यापारी संघटनांची आज बैठक

या लॉकडाऊनचे करायचे काय ? व्यापारी संघटनांची आज बैठक

Subscribe

शहरात करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता विविध भागात जनता कर्फ्यु घोषित करण्यात आला आहे. मात्र या बंदमुळे व्यापारी संघटनांमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळे कधी बंद तर कधी सुरू यामुळे नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. एकूणच या सर्व परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिकमधील सर्व व्यापारी, उद्योजक संघटनांची महत्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे.

करोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने आधी शहरातील व्यापारी संघटनांनी बंद पाळला. त्यानंतर याचा अनुकरण करत नविन नाशिक, नाशिकरोड, सातपूर, पंचवटी अशा सर्व भाागत व्यापार्‍यांनी स्वयंस्फुर्तीने बंद घोषित केला. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात आल्याने महापालिकेने या व्यापार्‍यांना कारवाईचा इशारा देत नोटीसा बजावल्या. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच सर्व व्यापारी या बंदमध्ये सहभागी होउनही प्रशासनाकडून नोटीसा बजावण्यात आल्याने व्यापार्‍यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तर गेल्या तीन महीन्यांपासून सर्व अर्थचक्र ठप्प असल्याने पुन्हा लॉकडाऊन केल्यास अर्थचक्र ठप्प होईल या भीतीने काही व्यापारी बंद ठेवण्यास तयार नाही. त्यामुळे या बंदवरून दोन गट निर्माण झाले आहेत. अनेक व्यापार्‍यांनी दोन दिवस बंदमध्ये सहभागी होत पुन्हा आपले व्यवहार सुरू केले.

- Advertisement -

एका विभागात बंद तर दुसर्‍या विभागात सर्व व्यवहार सुरू त्यामुळे हा आमच्यावर अन्याय असून लॉकडाऊनचा फायदा काय ? असा सवाल करत करायचे तर संपुर्ण शहरच लॉकडाऊन करा असाही सुरू व्यापार्‍यांमध्ये उमटतोय. एकूणच या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (दि. २६) रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शासकिय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, आयमा, निमा, आएम, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या विषयांवर होणार चर्चा

* शहराच्या मुख्य वस्तीत वाढती करोना रूग्णसंख्या
* सोशल डिस्टंसिंग पाळतांना येणारे अडथळे
* महापालिका अतिक्रमण विभागाकडून होणारा त्रास
* शहरात सुरू असलेला जनता कर्फ्यु
* जनता कर्फ्युबाबत व्यापार्‍यांमध्ये असलेले दोन गट
* दुकानांच्या निर्धारित केलेल्या वेळा
* सम विषम तारखेनूसार व्यवहार सुरू ठेवण्यात येणार्‍या अडचणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -