घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रराष्ट्रवादी युवकने उडवले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांच्या नावाचे विमान

राष्ट्रवादी युवकने उडवले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांच्या नावाचे विमान

Subscribe

नाशिक : वेदांता फॉक्सकॉन नंतर आता टाटा एअरबस तसेच अन्यही काही प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी याबाबत शिदे-फडणवीस सरकारवर झोड उठवली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार हिणावल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या राष्ट्रवादी भवन येथे कागदी विमानांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांचे नाव लिहून तसेच फोटो छापून ते विमान हवेत उडवत अनोखे आंदोलन केले. याआधी तब्बल दीड लाख नोकर्‍या तयार करणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. त्यानंतर आता टाटा एअरबस हा प्रकल्प हाही प्रकल्प गुजरातच्या बडोद्यामध्ये होणार आहे. याच्याच निषेधार्थ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने उपहासात्मक आंदोलन केले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

महाराष्ट्रात लाखो तरुण रोजगारापासून हिरावले गेल्यामुळे राज्याची वाटचाल अधोगतीच्या दिशेने होत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून राज्य अधोगतीच्या दिशेने जात आहे. त्यास जबाबदार असलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांच्या प्रतिमेचे कागदी विमान बनवून उडविले असे राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी बाळा निगळ, जय कोतवाल, निखिल भागवत, डॉ संदीप चव्हाण, निलेश भंदुरे, विशाल डोके, सागर बेदरकर, सोनू वायकर, अमोल नाईक, संतोष भुजबळ, जाणू नवले, सुनील घुगे, जितेंद्र जाधव, हर्षल चव्हाण, अजय बागुल, संजय सौदे, विशाल गुंजाळ आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यात नवीन उद्योगांना मध्ये शिंदे सरकारला अपयश आले असून आहे ते उद्योग राज्याबाहेर जात असल्यामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करणे बंद करावे. : अंबादास खैरे, शहराध्यक्ष युवक राष्ट्रवादी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -