घरताज्या घडामोडीPM Modi Pune Tour: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आंदोलन

PM Modi Pune Tour: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आंदोलन

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पुणे दौरा आहेत. काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल होतील. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करण्यासाठी आज मोदी पुण्यात येणार आहेत. पण त्यापूर्वीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. एकाबाजूला पुण्यातील अलका चौकात काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कार्यकर्ते पुणे स्टेशन बाहेरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ काळे कपडे घालून आंदोलन करत आहेत. त्यामुळे आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

पुण्यातील गरवारे मेट्रो स्टेशन जवळील अलका चौकशात काळे झेंड घेऊन पोस्टबाजी करून काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र काँग्रेसची बदनामी मोदींनी संसदेत केली. याप्रकरणी माफी मागावी आणि मग पुण्यात यावं, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. मोदीजी आले, मोदीजी आले, अरे हो इलेक्शन ही आले, अशी पोस्टबाजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

- Advertisement -

‘५ किलोमीटर मार्गाच्या उद्घाटनासाठी तुम्ही दिल्लीवरून येताय?’ 

एका वृत्तवाहिनी बोलताना एक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणाले की, ‘आमच्याकरता एखादा प्रकल्प आणाला असता तर आम्हाला निश्चित आवडला असता. ५१ किलोमीटर मेट्रो मार्गाचं पूर्णपणे नियोजन आहे. त्यातल्या ५ किलोमीटर मार्गाच्या उद्घाटनासाठी तुम्ही दिल्लीवरून येताय? गोव्याची निवडणूक संपली की, उत्तराखंड, मग ती संपली मग यूपी, यूपी संपली की मग पुणे महानगर पालिका त्यानंतर मग ग्रामपंचायत. अहो सर आपण भारताचे पंतप्रधान आहात, सारखी उद्घाटन, सारखा प्रचार किती आम्ही सहन करणार. या पुण्याच भाजपचे पूर्ण विद्रूपीकरण केले आहे. अख्ख्या शहरामध्ये बॅनर्स, पोस्टर्स, फ्लेक्स लावून शहराची वाट लावली आहे. स्मार्ट सिटी म्हणणाऱ्या पुणे शहरामध्ये लाखो खड्डे पडलेत ते बुजवायला यांना वेळ नाही. परंतु पंतप्रधानाच्या दौऱ्याचा तो मार्ग आहे, तिथे तुम्ही डांबर टाकून फसवणूक करताय? आपण फक्त पुणेकरांची नाही तर आपल्या नेत्याचीही फसवणूक करताय, हे पुण्यातील भाजपला लक्षात आलं पाहिजे. दरवेळेला मताच्या बाजाराकरता नौटंकी करायची असेल, तर कार्यक्रम आयोजित करायचे जनता याला निश्चित बळी पडणार नाही.


हेही वाचा- PM Modi Pune Tour: पंतप्रधान मोदी आज येणार पुण्यात; खास मोदींसाठी ऑस्ट्रेलियन हिऱ्यापासून बनवला शाही फेटा

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -