‘त्या’ नेत्यांवरील आरोपांचे काय झाले?, सोमय्या जवाब दो, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मुंबईत पोस्टरबाजी

Ncp banner ask kirit somaiya what happened in narayan rane other leader scam case after enter in bjp
'त्या' नेत्यांवरील आरोपांचे काय झाले?, सोमय्या जवाब दो, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मुंबईत पोस्टरबाजी

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. अनिल परब, भावना गवळी, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ यांच्याविरोधात घोटाळ्याचे आरोप करत सोमय्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करुन नेत्यांना अडचणीत आणल आहे. सोमय्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून मुंबईत मंत्रालय परिसरात सोमय्यांनी पुर्वी ज्या नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप केले त्यांचे पुढे काय झाले? असा सवाल केला आहे. किरीट सोमय्या जवाब दो अशी मोहिम राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून सुरु करण्यात आली असून शहरात पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून जवाब दो किरीट सोमय्या अशी मोहिम सुरु करण्यात आली आहे. सोमय्या यांनी यापुर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या नेत्यांवरील आरोपांचे पुढे काय झाले असा सवाल सोमय्यांचे पोस्टर लावून राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या तसेच काँग्रेसमधून भाजपमध्ये ज्या नेत्यांनी प्रवेश केला आहे. त्या नेत्यांवरील कारवाईचे पुढे काय झाले असा खोचक सवाल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत मंत्रालय परिसरात आणि मुंबईत किरीट सोमय्यांना जाब विचारणारे बॅनर्स, पोस्टर लावण्यात आले आहेत. सोमय्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

बॅनरवरुन सोमय्यांना सवाल

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भाजपमध्ये गेलेल्यांवर घोटाळ्याचे आरोप केले होते यामध्ये नारायण राणे, कृपा शंकर सिंह, विजयकुमार गावित आणि बबनराव पाचपुते यांच्यावरही आरोप केले होते. परंतु त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर पुन्हा सोमय्यांनी भ्रष्टाचाराबाबत एक शब्द काढला नाही. यावरुन राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी करुन या नेत्यांवरील तक्रारींचे काय झाले किरीट सोमय्या जवाब दो अशी मोहिम सुरु केली आहे.

पवारांना कुणीच वाचवू शकणार नाही – सोमय्या

अजित पवारांच्या जरंडेश्वर कारखान्याला भेट देऊन घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर आता अजित पवारांच्या सहीचा कागद दाखवून आणखी एक घोटाळा जनतेसमोर आणणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटलं आहे. अजित पवारांचे जे साम्राज्य आहे. एवढी जमीन, समृद्धी संपत्ती की किरीट सोमय्यांना पाहायला यायला हवं अशी चर्चा सुरु आहे., पवार घरण्यातील कारस्थानाचा नमुना समोर ठेवणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. राज्यात ठाकरे पवार यांनी स्वतःच अमाप घोटाळे केले आहेत त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही असे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे.


हेही वाचा : भाजपची ऑफर न स्वीकारण्याइतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत – चंद्रकांत पाटील