घरमहाराष्ट्रपवारांचा फोटो बॅनरवर लावल्यामुळे राष्ट्रवादी नेत्याची पक्षातून हकालपट्टी

पवारांचा फोटो बॅनरवर लावल्यामुळे राष्ट्रवादी नेत्याची पक्षातून हकालपट्टी

Subscribe

जळगाव : मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा संपूर्ण राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच राहणार, असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली होती. परंतु जळगावात भाजपाच्या वतीने लागलेल्या एका बॅनरमुळे अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने याची गंभीर दखल घेत बॅनरवर फोटो लावणाऱ्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनामाच्या नाट्यानंतर या चर्चेवर पडदा पडला आहे. मात्र, भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो असल्यामुळे हा बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन तथा राष्ट्रवादीचे सहकार क्षेत्रातील नेते संजय पवार यांनी भाजपा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त एका दैनिकात दिलेल्या जाहिरातीच्या माध्यमातून लावलेल्या फोटोवर पक्ष विरहित कारवाई केल्याचा ठपका लावत महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्गे यांनी पवार यांना बडतर्फ करण्याचे पत्र पाठवले आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?
गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात काही ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर अनेक वृत्तपत्रातही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी दिलेल्या जाहिरातीची जोरदार चर्चा सुरू झाली होती. या जाहिरातीमध्ये गिरीश महाजनांसोबत अजित पवारांचा देखील फोटो छापण्यात आला आहे. तसेच शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील फोटो या बॅनरवर छापण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचं भाजपसोबत बोलणं सुरू असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता हे बॅनर झळकल्यानं दुसरा गौप्यस्फोट होणार का?, असा प्रश्न सर्वांना पडला होता, पण तसे काहीही नव्हते.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -