Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र गृहमंत्रीपद : पदभार वळसे पाटलांचा, चर्चा मात्र जयंत पाटलांच्या फोटोची...

गृहमंत्रीपद : पदभार वळसे पाटलांचा, चर्चा मात्र जयंत पाटलांच्या फोटोची…

Related Story

- Advertisement -

माजी विधानसभा अध्यक्ष आणि विद्यमान मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यानंतर जलसंपदा मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्यासोबतचा युवक कारकिर्दीतील फोटो शेअर करुन अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. जयंत पाटील यांच्या शुभेच्छा आणि त्यांनी शेअर केलेल्या फोटोची चांगलीच चर्चा आहे.

“माझे जुने मित्र नामदार दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार आज स्वीकारला. कडक शिस्त… कायद्याची सखोल जाण असणारे ते प्रशासक आहेत. ज्या खात्यात काम केले तिथे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे,” असं म्हणत गृहमंत्री या नवीन जबाबदारीसाठीही जयंत पाटील यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

प्रशासकिय कामात राजकीय हस्तक्षेप करणार नाही

दिलीप वळसे पाटील यांनी आज गृहमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना गृहमंत्रीपदाची जबाबदारी मी पार पाडण्याचं काम करेन, असं सांगतानाच प्रशासकिय कामात कोणताही राजकीय हस्तक्षेप करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसंच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवी जबाबदारी दिल्याबद्दल आभार मानले.

- Advertisement -

 

 

 

- Advertisement -