Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन रणधीर कपूर यांच्याकडून करिनाच्या दुसऱ्या बाळाचे फोटो व्हायरल

रणधीर कपूर यांच्याकडून करिनाच्या दुसऱ्या बाळाचे फोटो व्हायरल

करिना कपूरचे वडिल रणधीर कपूर यांनी आपल्या नातवाचा म्हणजेच करिनाच्या दुसऱ्या मुलाचा फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला होता. पण काही वेळातच त्यांनी हा फोटो डिलीट केला.

Related Story

- Advertisement -

बॅालिवूड सेलिब्रिटींच्या प्रत्येक हालचांलीवर त्यांच्या चाहत्यांची बारिक नजर असते. चाहते नेहमी त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींना फोलो करत असतात. अभिनेत्री करिना कपूर खान हिचा चाहता वर्ग हा खूप मोठा आहे. तीने केलेल्या प्रत्येक पोस्ट वर लाखो लाईक्स आणि कंमेंट्स येतात. काही दिवसांपुर्वी करिना आणि सैफ अली खान दुसऱ्यांदा आई,बाबा झालेत. करिनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. यानंतर चाहत्यांमध्ये करिनाच्या दुसऱ्या मुलाला पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.

- Advertisement -

करिना कपूरचे वडिल रणधीर कपूर यांनी आपल्या नातवाचा म्हणजेच करिनाच्या दुसऱ्या मुलाचा फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला होता. पण काही वेळातच त्यांनी हा फोटो डिलीट केला. कदाचित त्यांच्याकडून हा फोटो चुकून पोस्ट झाला असल्याचे कळतेय. पण चाहत्यांनी लगेच या फोटोचा स्क्रीन शॅाट काढून घेतला. आत्तापर्यंत करिनाने दूसऱ्या मुलाचा चेहरा रीवील केला नाहीये. तसेच काही दिवसांपुर्वी तीने पाठमोऱ्या अवस्थेत चेहरा रीवील न करता दुसऱ्या मुलाचा फोटो शेअर केला होता.

 

- Advertisement -

करिनाच्या पहिला मुलगा तैमुरची एक झलक पाहण्यासाठी चक्क फोटोग्राफरचा गदारोळ असायचा. लहानग्या तैमुरचा फोटो रेट देखिल लावण्यात आला आहे. तसेच जन्मल्यापासून तैमुर बॅालिवूडच्या लाइमलाइट मध्ये आहे. पण करिनाने तिच्या दुसऱ्या मुलाला अद्याप पॅपराझी कल्चर पासून दूर ठेवल्याचे पाहायला मिळतय. सध्या करिनाच्या दुसऱ्या मुलाच्या फोटोची चर्चा सोशल मिडियावर रंगत आहे.


हे हि वाचा- रोहित शेट्टीच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यानी केले स्वागत

- Advertisement -