Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अजित पवार घोटाळेबाज, ताईंनाच अध्यक्ष करा; राष्ट्रवादीच्या माजी आमदारांचं मोठं वक्तव्य

अजित पवार घोटाळेबाज, ताईंनाच अध्यक्ष करा; राष्ट्रवादीच्या माजी आमदारांचं मोठं वक्तव्य

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्ती घेतल्यानंतर नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. येत्या एक-दोन दिवसांत शरद पवार आपला अंतिम निर्णय घेणार आहेत. दरम्यान, अजित पवार हे घोटाळेबाज असून खासदार सुप्रिया सुळेंनाच अध्यक्ष करा, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी केलं आहे.

शालिनीताई पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घाईनं घेतला. त्यांनी इतक्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती. राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष ठरवायचा असेल तर सुप्रिया सुळेंकडेच पद जावं. कारण सुप्रिया सुळे या पदासाठी सक्षम आहेत. अजित पवार हे गुन्ह्यांखाली अडकलेले घोटाळेबाज नेते आहेत. त्यांना राष्ट्रवादीचं अध्यक्षपद देणं चुकीचं ठरेल, असंही शालिनीताई पाटील म्हणाल्या.

- Advertisement -

आमदार हसन मुश्रीफ यांना १०० कोटींच्या मनी लाँड्रींग प्रकरणात ईडी चौकशीसाठी बोलावते मग अजित पवारांना १४०० कोटींच्या मनी लाँड्रींग प्रकरणात चौकशीसाठी का बोलवत नाही? अजित पवारांच्या पाठिशी भाजपचा बडा नेता आहे. त्यामुळे अजित पवारांना व्यवस्थित सावली मिळाली आहे. कुठल्याही चौकशीसाठी त्यांना बोलावलं जात नाही. मात्र, अजित पवारांना अटक होऊ शकते, इतके गुन्हे आणि आरोप त्यांच्यावर आहेत, असं शालिनीताई पाटील म्हणाल्या.

माझं वय ९० वर्षे आहे. मी अजूनही कामकाज सांभाळते शरद पवार माझ्यापेक्षा लहान आहेत, त्यांनी निवृत्त व्हायला घाई केली आहे, असं शालिनी पाटील यांनी म्हटलं आहे.


- Advertisement -

हेही वाचा : पवारांच्या राजीनाम्यानंतर कुंपणावरच्या नेत्यांचाच जास्त विलाप, ठाकरे गटाची टिप्पणी


 

- Advertisment -