घरमहाराष्ट्रपार्थ यांचे मैत्रिणीसोबतचे फोटो व्हायरल;संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल

पार्थ यांचे मैत्रिणीसोबतचे फोटो व्हायरल;संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस आणि घटक पक्ष्याचे उमेदवार पार्थ अजित पवार यांचे फोटो व्हायरल करणाऱ्या संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पार्थ पवार सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले. काही दिवसांपूर्वी त्यांचे राज्यातल्या अनेक मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतलेले फोटो देखील व्हायरल झाले होते आणि त्यानंतर त्यांचे खासगी जीवनातील मैत्रिणीसोबतचे फोटो देखील व्हायरल झाले होते. या फोटोंमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदनामी करण्याच्या हेतूने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेस आणि घटक पक्ष्याचे उमेदवार पार्थ अजित पवार यांचे मैत्रिणी सोबतचे खासगी फोटो आणि व्हिडिओ फेसबुक आणि व्हाट्सऍप ग्रुपवर व्हायरल केल्याप्रकरणी चिंचवड पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष वैशाली बाळासाहेब नागवडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीसीएमसी शिवसेना फेसबुक पेजवरील निखिल चांगदेव देवकाते-पाटील, श्रीमंत योगी या व्हाट्सऍप ग्रुप मधील संदीप दुबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सोमवारी मावळ मतदारसंघातील मतदान पार पडण्यास काही तास राहिले आहेत. मावळ लोकसभा मतदार संघात युतीचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यात लक्षवेधी लढत होत आहे. आरोपप्रत्यारोप फैरी सुरू आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून फेसबुकसह व्हाट्सऍप ग्रुपमध्ये पार्थ पवार यांचे महाविद्यालयीन जीवनातील मैत्रिणीसोबत फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून त्यांची नाहक बदनामी केली जात आहे. पार्थ पवार यांच्या बाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. सोशयल मीडियामुळे त्यांचे खासगी जीवनातील फोटो आणि व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाले. याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष वैशाली बाळासाहेब नागवडे यांनी घेत तातडीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसावर संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वाचा – पार्थ पवारसाठी उदयनराजे भोसले मैदानात

- Advertisement -

वाचा – भाजपा सरकारला आता हटवण्याची वेळ आली आहे – पार्थ पवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -