घरमहाराष्ट्रपुणे"फडणवीसजी, आपसे ये उम्मीद नहीं थी;" सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत

“फडणवीसजी, आपसे ये उम्मीद नहीं थी;” सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत

Subscribe

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या महाविकास आघाडीवरचे आरोप चांगलेच चर्चेत आले आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळेंनी अनोख्या स्टाईलमध्ये आपली खंत व्यक्त केलीय.

महाविकास आघाडीचे सरकार असताना मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेट मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिलं होतं, असा थेट आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यानंतर मात्र राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी अनोख्या स्टाईलमध्ये आपली खंत व्यक्त केलीय. “फडणवीसजी, आपसे ये उम्मीद नहीं थी,” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या महाविकास आघाडीवरचे आरोप चांगलेच चर्चेत आले आहेत. मागील काही दिवसांत महाराष्ट्रात आरोपांचा फक्त धुराळा उडतोय. प्रत्येक आरोपाला एका नव्या आरोपानं उत्तर दिलं जातं. गेल्या पाच दिवसांतील आरोपांची यादी बघितली तर मात्र ती यादी वाढतच जाताना दिसत आहे. जो व्यक्ती आरोप करतो आहे, त्यावर दुसऱ्याच दिवशी नवे आरोप लागत आहेत. कुणी एक बोट दाखवलं की लगेच त्याच्यावरही दुसरं बोट दाखवलं जातं आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळेंनीही खंत व्यक्त केलीय. “देवेंद्र फडणवीसांनी केलेलं वक्तव्य हे हास्यास्पद आहे. मला वाटतं दिलीप वळसे पाटील त्याच्यावर सविस्तर बोलले आहेत. खोट्या नाट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा पुण्यात कोयता गॅंग, धायरीत गोळीबार झाला, अशा घटना घडल्या आहेत. यावर राज्याचे गृहमंत्री म्हणून फडणवीसांनी बोलणं अपेक्षित होतं. त्यांना विनम्र विनंती आहे की, पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सगळीकडे गुन्हेगारी वाढत आहे. अशा परिस्थितीवर त्यांनी बोलावे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यायला पाहिजे, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. सत्ताधारी असोत वा विरोधक दोन्ही बाजूंनी आरोपांचा धुराळा आता सुरू झाला आहे. आरोपांची ही साखळी येत्या काही दिवसांत अजून लांबण्याची चिन्हं मात्र दिसून येत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -