आताच काय ती पब्लिसिटी घ्या, तीन वाजल्यानंतर राऊतांचे सिक्सर असतील – सुप्रिया सुळे

NCP MP Supriya sule reaction on shivsena mp sanjay raut Press conference

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज शिवसेना भवनमध्ये दुपारी ४ वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शिवसेना भवनखाली मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. त्यामुळे सध्या राऊतांच्या परिषदेची जनतेसह नेत्यांना देखील उत्सुकता लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) पुण्यातील एका कार्यक्रमात म्हणाल्या की, ‘आताच काही ती पब्लिसिटी करून घेऊयात, तीन वाजल्यानंतर संजय राऊत टेकओव्हर करतील आणि राऊतांचे सिक्सर असतील.’

आज पुण्यामधील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एकाच व्यासपिठावर उपस्थितीत होते. त्यावेळी सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख केला. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘आपल्या प्रतिक्रिया घेतल्या तर आमच्या पक्षाला पैसे द्या असे माध्यमांना सांगितले पाहिजे. कारण तुम्ही आमच्यावरून तुमचे चॅनल चालवता. दादा असे म्हणाले यावर स्टोरी करून तुम्ही माझा आणि चंद्रकांत पाटलांचा फोटो लावता. त्यामुळे जे काही करायचे आहे ते तीन वाजल्याच्या आत करू घ्या. तीन वाजल्यानंतर संजय राऊत टेकओव्हर करतील आणि मग राऊतांचे सिक्सर आहेत.’

मग त्यानंतर सुप्रिया सुळे चंद्रकांत पाटलांकडे बघू म्हणाल्या की, ‘आपण दोघं काय आपली पब्लिसिटी करून घ्यायची आहे, ती आताच करून घेऊयात. आधी थोडसं तरी ठरवून बोलायला पाहिजे होत. मग तेवढी तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळाली असती.’

पुण्यातील या कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, ‘मला पत्रकार परिषदेचा विषय माहित नाही. संपूर्ण राज्यासह देश राऊतांच्या परिषदेकडे अपेक्षेने बघतोय. कारण राऊतांनी काल जे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आपण सगळे पुढे काय होते याची वाट बघूयात. साधारण ते जेव्हा असा इशारा देतात तेव्हा ते काहीतरी महत्त्वाचे, राज्याच्या आणि देशाच्या हिताचे असेल, असा माझा विश्वास आहे.’


हेही वाचा – ED Raids In Mumbai: ईडी छापेमारीत नेत्यांची नाव येतील की घुसवली जातील हे सांगता येत नाही – संजय राऊत