घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रराष्ट्रवादीने लावले छत्रपती संभाजीनगर रोडचे दिशाफलक; सेना, मनसे, भाजपाला धोबीपछाड

राष्ट्रवादीने लावले छत्रपती संभाजीनगर रोडचे दिशाफलक; सेना, मनसे, भाजपाला धोबीपछाड

Subscribe

नाशिक : औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर आता नाशिकमध्येही राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून औरंगाबाद नाक्यावर छत्रपती संभाजी नगर फलक लावण्यात येऊन चौकाचे नामकरण करण्यात आले.
औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात यावे, अशी जुनी मागणी होती. त्यानुसार शासनाने नामकरणाचा निर्णय घेतला. मात्र, नाशिकमधून औरंगाबादकडे म्हणजेच संभाजीनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर औरंगाबादकडे असा फलक मात्र कायम होता.

या चौकाला औरंगाबाद रोड म्हणून ओळखले जाते. मात्र आता या चौकालाही छत्रपती संभाजीनगर रोड म्हणावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली होती. आता शासनानेच नामकरण केल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने औरंगाबादकडे जाणार्‍या रस्त्यारील चौकातील जुना फलक हटविण्यात येऊन संभाजीनगर रोड असा फलक लावण्यात आला. या फलकाचे अनावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, शहर सरचिटणीस संजय खैरनार, शंकर मोकळ, अमर तांबे, ज्ञानेश्वर जाधव, दीपक पाटील, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे, संतोष जगताप, कुलदीप जेजुरकर, निलेश सानप, जयवंत गोडसे, सागर तांबे, निलेश जाधव, राम शिंदे, राज रंधवा, सागर पुरकर, सचिन आहिरे, महेश जाधव, रवी सोमसे आदींसह मोठया संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

- Advertisement -
राष्ट्रवादीची मनसे, भाजप, शिवसेनेवर कुरघोडी 

खरतर मनसे, शिवसेना, भाजप ही तीन पक्ष हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन आपली वाटचाल करतात. छत्रपती संभाजी नगरच्या नामंतरासाठी मागील अनेक वर्ष या तीन पक्षांनी अनेक आंदोलन केली. त्यासाठी मोठा संघर्ष करत या पक्षाच्या कार्यकरतींनी वेळे प्रसंगी अनेक केसेसही स्वतच्या अंगावर घेतली. जेव्हा अधिकृत रित्या औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर करण्यात आले त्यानंतर अशा पद्धतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सर्वप्रथम संभाजी नगर जिल्हयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे नामकरण करण्याचा उपक्रम राबवून एक प्रकारे भाजपा, मनसे व शिवसेना या तीनही पक्षांना धोबीपछाड दिल्याची चर्चा नाशिक शहरात रंगली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -