घरठाणेठाण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का, सहा माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का, सहा माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

Subscribe

ठाण्यात मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. कळवा-मुंब्रा आणि ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही माजी नगरसेवक हे शिंदे गटात जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात पोस्टर वॉर देखील सुरू होते. मात्र, आता ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

आज संध्याकाळच्या दरम्यान ठाण्यातील लक्ष्मी पार्क सर्व्हिस रोड येथील कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत ठाणे मनपा प्रभाग क्रमांक सहा मधील सर्वच म्हणजे चारही माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीला सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी केला शिंदे गटात प्रवेश

हणमंत जगदाळे, माजी ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी विरोधी पक्षनेते

- Advertisement -

राधाबाई जाधवर, माजी नगरसेविका

दिगंबर ठाकूर, माजी नगरसेवक

वनिता घोगरे, माजी नगरसेविका

संभाजी पंडीत, माजी नगरसेवक

संतोष पाटील, माजी परिवहन समिती सदस्य

दरम्यान, माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाण्यात राष्ट्रवादीला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. माजी नगरसेवक हणमंत जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक मानले जातात. परंतु त्यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे आव्हाडांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नागरिक हेच आपले टॉनिक आणि ऊर्जा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मी घेणारा नाहीतर देणारा आणि देत राहणारा मुख्यमंत्री आहे. कारण राज्यातील जनतेच्या आशीर्वादामुळे मला ही संधी प्राप्त झाली आहे. माझ्यावर जेवढे आरोप करतील, त्याच्या दहा पटीने काम करणार आहे. याशिवाय आपला कोणताही वैयक्तिक अजेंडा नसून लोकांना समानतेने जगता आले पाहिजे, हाच आपला अजेंडा असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमातून व्यक्त केले. यावेळी जनता, नागरिक हेच आपले टॉनिक आणि ऊर्जा असल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा : ठाकरे गटासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिंदे गटात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -