घरमहाराष्ट्रNCP : यंदाच्या लोकसभेतही ही वस्तूस्थिती मान्य करावी लागेल, राष्ट्रवादीचा अमोल कोल्हेंना...

NCP : यंदाच्या लोकसभेतही ही वस्तूस्थिती मान्य करावी लागेल, राष्ट्रवादीचा अमोल कोल्हेंना टोला

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात बारामतीबरोबरच शिरुर लोकसभा मतदारसंघाकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिरूरमध्ये विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार अमोल कोल्हे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करत, यंदाच्या लोकसभेतही ही वस्तूस्थिती मान्य करावी लागेल, असे म्हटले आहे.

हेही वाचा – Congress : आता पाप करणारे भाजपात जातात, महाराष्ट्र काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल लक्ष्य

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे डॉ. अमोल कोल्हे यांना पुन्हा तिकीट दिले जाण्याची दाट शक्यता आहे. तर, दुसरीकडे डॉ. कोल्हे यांचे प्रतिस्पर्धी, शिंदे गटाचे नेते शिवाजीराव अढळराव पाटील यांनी अलीकडेच अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांनाच पुन्हा कोल्हे यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकीत शिरूरमध्ये आपला उमेदवार देणार आणि निवडूनही आणणार, असा निर्धार अजित पवार यांनी केला होता. मी जे बोलतो ते करून दाखवतो, असेही ते म्हणाले होते.

- Advertisement -

अजित पवार यांचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने (एनसीपी-एसपी) स्वीकारले आहे. काही लोक अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याची भाषा करतात. पण, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना घरोघरी पोहचवणाऱ्या अमोल कोल्हे यांचा पराभव करणे, एवढे सोपे नाही, असे प्रत्युत्तर एनसीपी-एसपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले होते.

हेही वाचा – Arvind Kejriwal : नागरिकांचे हक्क सुरक्षित राहतील याची काळजी घ्या; संयुक्त राष्ट्रांना देखील चिंता केजरीवालांची

पण आता राष्ट्रवादी काँग्रेसने अमोल कोल्हे यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अजित पवार यांनी जातीने लक्ष घातल्यामुळे विजय मिळाला. फक्त चेहरा असून चालत नाही, अजितदादांचा हात असेल तरच निवडणूक जिंकता येते, ही वस्तुस्थिती असल्याचे एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी म्हटल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळते. याबरोबर, यंदाच्या लोकसभेतही ही वस्तूस्थिती मान्य करावी लागेल डॉक्टरसाहेब, असा टोलाही राष्ट्रवादी काँग्रेसने लगावला आहे.

हेही वाचा – Nashik Constituency : नाशिकची उमेदवारी 101 टक्के मलाच; हेमंत गोडसेंचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -