घरCORONA UPDATEकोरोनामुळे आता नवे शैक्षणिक वर्ष सप्टेंबर ते जुलै; विद्यापीठांच्या परिक्षांचीही तारीख ठरली

कोरोनामुळे आता नवे शैक्षणिक वर्ष सप्टेंबर ते जुलै; विद्यापीठांच्या परिक्षांचीही तारीख ठरली

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे देशातील सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा लांबणीवर गेल्या आहेत. देशभरातील विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांनी परीक्षा १ ते ३१ जुलै या कालावधीत आयोजित करून अंतर्गत मूल्यमापनांसाठी आवश्यक प्रकल्प १६ ते ३० मे या कालावधीत पूर्ण करावेत, अशा शिफारसी विद्यापीठ अनुदान आयोगाने गठित केलेल्या समितीने केल्या आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) हरयाणा येथील केंद्रीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. आर. सी. कुहाड यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना केली होती. या समितीने आपला अहवाल आयोगास सादर केला आहे. समितीने १५ मे पर्यंत ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात यावे. त्यानंतर १६ ते ३१ मे या कालावधीत प्रोजेक्ट वर्क, ई-लॅब्ज, अभ्यासक्रमाची पूर्तता, अंतर्गत मूल्यमापन आदी बाबी पूर्ण करण्यात याव्यात. यानंतर जून महिन्यात उन्हाळी सुटी द्यावी. सुट्टीनंतर १ ते १५ जुलै या कालावधीत टर्मिनल सेमिस्टर परीक्षांचे आयोजन करून त्याचा निकाल ३१ जुलै पर्यंत जाहीर करावा. तसेच १६ ते ३१ जुलै इंटरमीडिएट सेमिस्टर परीक्षांचे आयोजन करून त्याचा निकाल १४ ऑगस्टपर्यत जाहीर करावा, अशी शिफारस समितीने केली आहे.

- Advertisement -

विद्यापीठांनी परीक्षा घेताना ७०ः३० हे सूत्र वापरावे. यासह विद्यापीठे आपापल्या स्तरावर विविध संकल्पनांचा वापर करून परीक्षांचे नियोजन करू शकतात, असेही समितीने सुचित केले आहे. एकाचवेळी जास्त विद्यार्थ्यांना न बोलावता दिवसभरात दोन वेळा एकाच इयत्तांच्या परीक्षांचे आयोजनही करता येऊ शकेल. याच पद्धतीचा वापर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठीही होऊ शकतो, असेही समितीने म्हटले आहे.

सप्टेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्ष

प्रथम वर्ष पदवीचे प्रवेश १ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत पूर्ण करावेत. त्यानंतर १ सप्टेंबरपासून प्रथमवर्षाचे वर्ग सुरू करावेत. याची परीक्षा १ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत पार पडेल. तर अंतिम परीक्षा १ ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत आयोजित करण्याची शिफारस समितीने केली आहे. दुसऱ्या वर्षापासून पुढील इयत्तांचे शैक्षणिक वर्ष १ ऑगस्टपासून सुरू होईल. तर यामुळे यापुढे सप्टेंबर ते जुलै असे शैक्षणिक वर्ष राहील, अशी शिफारसही समितीने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -