घरमहाराष्ट्रतरुणांनो खूशखबर! MPSC मार्फत होणार 'या' सरकारी पदांची भरती

तरुणांनो खूशखबर! MPSC मार्फत होणार ‘या’ सरकारी पदांची भरती

Subscribe

राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर नवीन मंत्रिमंडळ आले, मात्र गेली अनेक वर्षे सरकारी नोकरी करु पाहणाऱ्या उमेदरावारांच्या समस्या, अडचणी तशाच आहेत. राज्य सरकारकडून अनेक सरकारी नोकऱ्यांचे टेंडर निघाले असतानाही प्रत्यक्ष नोकरी भरती प्रक्रिया राबवण्यात आली नाही. ज्यामुळे अनेक तरुण सरकारी नोकरीकडे डोळे लावून आहेत. यात आता सत्ता आल्यानंतर नव्या राज्य सरकारने निर्णयांचा आणि घोषणांचा धडाका सुरु केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने आता सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यातील वर्ग 3 मधील रिक्त लिपिक पद ही एमपीएससी मार्फत भरली जाणार असल्याचा निर्णय आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही एक खुशखबर आहे. आजवर वर्ग 3 मधील लिपिक पदाची रिक्त पदं एमपीएससी मार्फचत भरली जात नव्हती. यासाठी राज्य सरकार स्वतंत्र भरती प्रक्रिया राबवत होते. मात्र आता सर्व पदं MPSC मार्फत भरली जाणार असल्याने परीक्षेत कुठलाही घोटाळा होणार नाही आणि मेहनती उमेदवारांनाही नोकरीची संधी मिळणार आहे.

- Advertisement -

- Advertisement -

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

यानंतर पु.ल. देशपांडे अकादमीमध्ये तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाच्या कामकाजाला २८ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे.

औसा येथे दिवाणी न्यायाधीश न्यायालय स्थापन करून पद निर्मिती करणार असल्याचा निर्णयही मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

आपत्ती निवारणाच्या विविध प्रकरणांची चर्चा व निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात येणार आहे.


पुण्यातील 1 ऑक्टोबरला सीएनजी पंप बंद राहणार


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -