घरमहाराष्ट्रनितेश राणेंसह १९ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

नितेश राणेंसह १९ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Subscribe

अभियंत्यावर झालेल्या चिखलफेक प्रकरणात नितेश राणेंसह १९ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आमदार नितेश राणे यांनी अभियंत्यावर केलेल्या चिखलफेक प्रकरणात आता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अभियंत्यावर झालेल्या चिखलफेक प्रकरणात नितेश राणेंसह १९ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे २३ जुलैपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत असणार आहे. आमदार नितेश राणे यांच्यासह १८ कार्यकर्त्यांना आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, जिल्हा सत्र न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या वकीलांचे प्रयत्न सुरु आहेत.

काय आहे प्रकरण 

कणकवली गडनदी पुलावर चार जुलैला आंदोलन झाले होते. यावेळी शेडेकर यांच्यावर चिखलफेक आणि त्यांना बांधून ठेवण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी आमदार नितेश राणेंसह कार्यकर्त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, कणकवली महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी अटक आमदार नितेश राणे यांच्यासह स्वाभिमानच्या १९ कार्यकर्त्यांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -

नितेश राणेंची दबंगगिरी 

आमदार नितेश राणे यांनी महामार्गाची पाहणी करताना रस्ते अभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलाची आंघोळ घातली. यासोबतच राणे यांनी अभियंताला गडनदी पुलाला बांधले. महामार्ग सेवा रोड तुझा बाप बांधणार का? असा सवाल नितेश राणेंनी केला. मुंबई-गोवा महामार्गावर चिखल आणि खड्ड्यांमुळे प्रवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत. त्यामुळे राणे यांनी अभित्यांची खबर घेतली. महामार्गावरील खड्ड्यांमुळे नितेश राणेंच्या रोषाला आज महामार्ग उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना सामोरे जावे लागले. आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी शेडेकर यांना गडनदी पुलाला बांधून ठेवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -