पवारांसोबत असणाऱ्यांना श्रद्धेचं महत्त्व समजणार नाही, भुजबळांचं वक्तव्य ओवैसींसारखं; नीलेश राणेंची टीका

नोटांवर पण फक्त गांधीजी कशाला सगळे महापुरुष पाहिजे. हिंदू धर्मामध्ये पारंपारिक श्रद्धेला वेगळं महत्त्व आहे पण ते पवार साहेबांच्या सोबत असणाऱ्यांना समजणार नाही. हे वाक्य ओवेसी बोलण्यासारखं आहे, अशी टीका निलेश राणे यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

chhagan bhujbal and nilesh rane

मुंबई – ज्यांच्यामुळे तुम्हाला शिक्षण मिळालं, अधिकार मिळाला त्यांची पूजा करा, हे तुमचे देव असले पाहिजेत. यांना देव मानून त्यांची पूजा केली पाहिजे. त्यांच्या विचारांची पूजा केली पाहिजे. बाकीचे देव वैगरे नंतर बघूया असं विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळा यांनी केलंय. भुजबळांच्या या विधानावर आता भाजप नेते नीलेश राणे यांनी आक्षेप नोंदवत टीका केली आहे.

हेही वाचा – शाळेत सरस्वतीचा फोटो का? त्यांची पूजा का करायची? छगन भुजबळांचे वादग्रस्त विधान

नोटांवर पण फक्त गांधीजी कशाला सगळे महापुरुष पाहिजे. हिंदू धर्मामध्ये पारंपारिक श्रद्धेला वेगळं महत्त्व आहे पण ते पवार साहेबांच्या सोबत असणाऱ्यांना समजणार नाही. हे वाक्य ओवेसी बोलण्यासारखं आहे, अशी टीका नीलेश राणे यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

हेही वाचा – गावकऱ्यांना आपसात भिडवणे हा बारामतीचा पॅटर्न, भाजपाचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

छगन भूजबळांच्या या वक्तव्यावरून भाजपकडून जोरदार प्रतिक्रिया येत असून राम कदम यांनीही त्यांच्यावर टीका केली. राम कदम म्हणाले की, आज यांना आमच्या देवी देवतांचे फोटो खटकत आहेत. उद्या मंदिरंही खटकतील, मंदिरे कशाला हवीत. ती पाडून टाका असं म्हणतील. सर्वच महापुरुष आमच्यासाठी आराध्य आहेत. परंतु राष्ट्रवादीची ही पद्धत कुठली? हिंदुत्वाबद्दल काँग्रेस – राष्ट्रवादीला का राग आहे? यांच्यासोबत पेग्विन सेनेचे नेते आहेत त्यांची काय भूमिका आहे? त्यामुळे राष्ट्रवादीने हिंदू देवी देवतांचा अपमान केला त्यामुळे त्यांनी जनतेची माफी मागायला हवी असंही राम कदमांनी सांगितले.

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

शाळेत सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाळासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही पाहिलं नाही. ज्यांना शिकवलं नाही. असेलचं शिकवलं तर ते फक्त 3 टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची? ज्यांच्यामुळे तुम्हाला शिक्षण मिळालं, अधिकार मिळाला त्यांची पूजा करा, हे तुमचे देव असले पाहिजेत. यांना देव मानून त्यांची पूजा केली पाहिजे. त्यांच्या विचारांची पूजा केली पाहिजे. बाकीचे देव वैगरे नंतर बघूया.