घरमहाराष्ट्रए फॉर आदित्य, ए फॉर आफताब; आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, नितेश...

ए फॉर आदित्य, ए फॉर आफताब; आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, नितेश राणेंची मागणी

Subscribe

Aditya Thackeray Narco Test | सुशांतसिंह मृत्यूप्रकरणाची चौकशी सुरू असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपूत्र नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. सुशांतच्या मृत्यूमागे आदित्य ठाकरेंचा हात आहे, असा स्पष्ट दावा त्यांनी केला होता. आता लोकसभेपर्यंत हे प्रकरण पोहोचल्याने यावर पुन्हा चर्चा होत आहे.

नागपूर – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) आणि त्याची माजी व्यवस्थापक दिशा सालिअन (Disha Salian) यांच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंवरील (Aditya Thackeray) आरोपाचा फास आणखी घट्ट होत आहे. याप्रकरणात सातत्याने आदित्य ठाकरेंचंच नाव का घेतलं जातंय? असा प्रश्न उपस्थित करत सत्य समोर येण्याकरता आदित्य ठाकरेंची नार्को चाचणी करा, अशी आग्रही मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे. विधानभवन परिसरात आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा – नितेश राणेंचा अंधारे, पवार, ठाकरेंवर निशाणा; म्हणाले देवतांची बदनामी करण्याचं सर्टिफिकेट…

- Advertisement -

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत काल सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार पोलिसांचा चौकशी अहवाल सादर केला. यानुसार, सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाला एयू नावाने ४४ कॉल्स आहे होतो. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असा बिहार पोलिसांचा दावा आहे, असं राहुल शेवाळेंनी लोकसभेत सांगतिलं. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावरून भाजपा नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

‘दिशा सालिअन आणि सुशांतचं मृत्यू प्रकरण जेव्हा जेव्हा काढलं जातं तेव्हा आदित्यचंच नाव का घेतलं जातं? दुसऱ्या राजकारण्याचं नाव का घेतलं जात नाही? दुसरे राजकारणी महाराष्ट्रात नाही का? डाल मे कुछ काला है,’ असं नितेश राणे म्हणाले.

- Advertisement -

खासदार राहुल शेवाळे हे तर मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये होते. त्यांचे लाडके होते. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून वर्षानुवर्षे काम केलं आहे. स्थायी समिती अध्यक्ष असताना, खासदार असताना तेव्हा तुमच्या घरात ते पेट्या पोहोचवायचे तेव्हा तुमच्या लेखी त्यांनी किंमत होती, आणि आता किंमत नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘सुशांतचे फॅन्सही सांगत आहेत की याप्रकरणाची चौकशी व्हावी. याप्रकरणात आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा. ए फॉर आफताब आणि ए फॉर आदित्य. सगळ्या विकृतींचं नाव ‘ए’वरूनच झाले आहेत. सत्य लोकांसाठी बाहेर येऊ देत. दिशा सालिअनची केस मुंबई पोलिसांकडे आहे, सीबीआयकडे नाही. त्यामुळे दिशाची केस पुन्हा सुरू करा, चौकशी करा. ८ आणि ९ जूनच्या रात्री नक्की काय झालं, रियाचा त्यात काय हात आहे का? तिच्या येथील सीसीटीव्ही फुटेज का गायब आहेत, ८ आणि ९ जून रोजीची व्हिजिटरची पुस्तके का फाडण्यात आली? दिशाचा पोस्टमार्टम रिपोर्ट अद्यापही बाहेर आलेला नाही. तिची आत्महत्या असेल तर रिपोर्ट का लपवला जात आहे? असे असंख्य सवाल नितेश राणेंनी यावेळी उपस्थित केले.

हेही वाचा – हो,मी योग्य तेच बोललो; आमदार नितेश राणे आपल्या वक्तव्यावर ठाम

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणाची चौकशी सुरू असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपूत्र नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. सुशांतच्या मृत्यूमागे आदित्य ठाकरेंचा हात आहे, असा स्पष्ट दावा त्यांनी केला होता. आता लोकसभेपर्यंत हे प्रकरण पोहोचल्याने यावर पुन्हा चर्चा होत आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -