घरमहाराष्ट्रआपण 'भावी मुख्यमंत्री'च्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले, नितेश राणेंचा अजित पवारांवर पलटवार

आपण ‘भावी मुख्यमंत्री’च्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले, नितेश राणेंचा अजित पवारांवर पलटवार

Subscribe

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. नारायण राणे हे मुंबईतील निवडणुकीत एका महिलेकडून पराभूत झाल्याची उपहासात्मक टीका अजित पवार यांनी केली आहे. नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी, आपण फक्त ‘भावी मुख्यमंत्री’च्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले दिसता, असे म्हणत अजित पवारांवर पलटवार केला आहे.

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यात कायम कलगितुरा रंगतो. अगदी एकमेकांवर खटला दाखल करण्याचे दावे दोघांकडून केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत नारायणे राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

‘नारायण राणेंनी शिवसेना फोडली. सगळे पडले की नाही? राणेसाहेब तर दोनदा पडले. एकदा तिथे कोकणात पडले आणि एकदा मुंबईत वांद्रे का कुठे उभे होते, तिथेही पडले. तिथे तर महिलेने पाडलं.. हां… बाईनं पाडलं बाईनं…,’ अशी उपहासात्मक टीका अजित पवार यांनी या व्हिडीओत केली आहे. ‘दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज! नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश!,’ अशी टिप्पणी संजय राऊत यांनी त्यावर केली आहे.

- Advertisement -

आता आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरून अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘अजित दादा मोठे नेते आहेत. पण वाचल्याशिवाय जमतच नाही बघा. राष्ट्रवादीच्या स्क्रिप्टरायटर मित्रांनी जरा योग्य माहिती “लिहून” दिली पाहिजे. राणे साहेबांबरोबर शिवसेनेतून आलेले शाम सावंत सोडून सगळे आमदार परत निवडून आले. माहिती असू दे दादा. बस्स, यावेळी माझा मित्र पार्थला निवडून आणा. गेल्या वेळी एका साध्या शिवसैनिकाने पाडला माझ्या मित्राला. म्हणून ते काही होते का बघा, असे सांगत पार्थ पवार यांच्या पराभवावरून बोचरी टीका नितेश राणेंनी केली आहे.

‘राणे साहेब देशाचे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचले. आपण काय फक्त भावी मुख्यमंत्रीच्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले दिसत आहात,’ असा पलटवारही नितेश राणे यांनी केला आहे.

अजित पवारांना ‘टिल्लू’चे करून दिले स्मरण
छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर’ नाहीत तर, ‘स्वराज्यरक्षक’ आहे, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. त्यावरून नितेश राणे यांनी टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता, टिल्लू लोकांनी आम्हाला सांगू नये. त्यांची उंची किती त्यांची झेप किती त्यांना मी कशाला उत्तर देऊ. असल्या लोकांच्या मी नादी लागत नाही, असे अजित पवार म्हणाले होते. नितेश राणे यांनी आज, शुक्रवारी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी याचे स्मरण करून दिले आहे. आपल्या ट्वीटच्या शेवटी ‘तुमचा आवडता, टिल्लू’ असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -