घरमहाराष्ट्रदेर न हो जाए कहीं देर न हो जाये; नितेश राणेंकडून शिवसेनेच्या...

देर न हो जाए कहीं देर न हो जाये; नितेश राणेंकडून शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला मिश्किल टोला

Subscribe

मेहफील सजी है, आजा, देर ना हो जाए आ जा, असं गाणं टाकून नितेश राणे यांनी अनिल परबांना मिश्लिल टोला लगावला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर काल मध्यरात्री उशिराने ईडीने अटक कारवाई केली. दरम्यान, राष्ट्रवादीचे दोन नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना आमदार अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांचा फोटो पोस्ट करून त्यावर एक गाणं लावण्यात आलं आहे. मेहफील सजी है, आजा, देर ना हो जाए आ जा, असं गाणं टाकून नितेश राणे यांनी अनिल परबांना मिश्लिल टोला लगावला आहे.

हेही वाचा – राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्याचा वाद दाबण्यासाठीच संजय राऊतांना अटक, शिवसेनेचा दावा

- Advertisement -

दापोलीतील रिसॉर्ट खरेदीमध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप करत शिवसेना आमदार अनिल परब यांच्यावर ईडी चौकशी लावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. संजय राऊतांना अटक झाल्याने अनिल परबही अडचणीत सापडले आहेत. अनिल परबांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांनाही अटक होऊ शकते, असं सांगण्यात येतंय. त्यामुळे भाजप नेते नितेश राणे यांनी त्यांना मिश्किल टोला लगावत त्यांना टार्गेट केलं आहे.

हद हो चुकी है आजा, जाँ पर बनी है आजा महफ़िल सजी है आजा के तेरी कमी है आजा देर न हो जाए कहीं देर न हो जाये ओ.. देर न हो जाए कहीं देर न हो जाये, हे गाणं अनिल परबांच्या फोटोला लावून ट्विट केलं. त्यामुळे त्यांच्या या मिश्किल टोल्यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -


काय आहे प्रकरण?

२०१७ मध्ये अनिल परब यांनी दापोली येथे एक प्लॉट खरेदी केला होता. प्लॉटच्या नोंदणीनंतर परब यांनी २०२० मध्ये मुंबईतील केबल ऑपरेटर सदानंद कदम यांना ही जमीन १.१० कोटी रुपयांना विकली. त्यानंतर या व्यवहारात अनेक प्रकारची फसवणूक झाल्याचा आरोप परब यांच्यावर करण्यात आला आहे. याच दरम्यान या भूखंडावर रिसॉर्ट बांधण्यात आले. त्याच्या बांधकामासाठी ६ कोटी रुपये खर्च करण्यात आले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर साई रिसॉर्टवरुन आरोप केला होता. साई रिसॉर्ट हा अनिल परब यांचा असून त्यांनी कोरोना काळात मंत्री पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप किरीट सोमय्या त्यांनी केला होता. साई रिसॉर्टचे मालक अनिल परब असून त्यांनी मालमत्ता सदानंद कदम यांना विकली. त्यायानंतर सदानंद कदमांचे पत्र उघड करुन सोमय्यांनी पुरावे सुद्धा दिले.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -