घरताज्या घडामोडीकोश्यारींच्या वक्तव्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही - महेश तपासे

कोश्यारींच्या वक्तव्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही – महेश तपासे

Subscribe

राज्यपाल पदाची जबाबदारी स्वीकारल्यावर भारतीय राज्यघटनेचे संरक्षण करणे, राज्य शासनास वेळोवेळी मार्गदर्शन करणे अशा अनेक गोष्टी भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून अपेक्षित होत्या.

मुंबई : महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पायउतार झाल्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. त्यांचे वक्तव्य राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केले आहे. (No need to take Koshyari statement too seriously Mahesh Tapase)

वास्तविक, राज्यपाल पदाची जबाबदारी स्वीकारल्यावर भारतीय राज्यघटनेचे संरक्षण करणे, राज्य शासनास वेळोवेळी मार्गदर्शन करणे अशा अनेक गोष्टी भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून अपेक्षित होत्या. परंतु सरकार स्थापनेचे निमंत्रण न देताच एकनाथ संभाजी शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला, याचा खुलासा आरटीआयमधून झालेला आहे असेही महेश तपासे म्हणाले.

- Advertisement -

अनेक वक्तव्यांवर स्वतःचे मत मांडणाऱ्या भगतसिंग कोश्यारी यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिले नसल्याचे आता आरटीआयच्या माहितीतून समोर आले आहे यावरही आपले मत भगतसिंग कोश्यारी यांनी मांडायला हवे असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडी सरकार पायउतार होताच शिंदे-फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी दिलेले पत्र अखेर कुठे आहे, याचे उत्तर भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

महाविकास आघाडीने मला यासंदर्भात ५ पानांचे पत्र दिले होते. या पत्रात तुम्ही राज्यपालांना धमकी देत आहात. कायदे सांगत आहात आणि शेवटी लिहिता की १५ दिवसांत यादी मंजूर करा. कुठे लिहिले आहे की मुख्यमंत्री राज्यपालांना सांगू शकतो की इतक्या दिवसांच्या आत यादी मंजूर करून पाठवा. संविधानात कुठे लिहिले आहे? मला निर्णय घेण्यासाठी मुदत कशी दिली जाऊ शकते. तुम्ही विनंती करायला हवी. हे पत्र जेव्हा समोर येईल तेव्हा तुम्हाला कळेल की सत्य काय आहे. तसे पत्र पाठवले नसते तर मी पुढच्याच दिवशी त्यावर सही करणार होतो, असे म्हणत कोश्यारी यांनी संताप व्यक्त केला.

तसेच विधानसभा अध्यक्ष निवडीची प्रक्रियाही चुकीची होती. मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्षांपेक्षा मोठे नाहीत. तेव्हाही मला धमकी देणारे पत्र लिहिण्यात आले. नवीन सरकार आले तेव्हा त्यांनी व्यवस्थित पत्र दिले. म्हणूनच नवीन अध्यक्षांची निवड तात्काळ केली, असा खुलासा कोश्यारी यांनी केला.


हेही वाचा – मोठी बातमी! मला मारण्यासाठी शिंदेंनी गुंडाला सुपारी दिली, राऊतांचे पोलीस आयुक्तांना पत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -